Skip to main content

किल्ले हडसर - एक प्रेक्षणीय व थरारक भटकंती

लेखक वझेबुवा यांनी शनिवार, 13/03/2021 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम.. हल्ली शनिवार-रविवारी गडांवर होणारी गर्दी पाहता आता जमल्यास वीकडेज मध्ये ट्रेक करत जाऊ असं मी आणि एका मित्राने सहज ठरवलं आणि 17 फेब्रुवारी च्या बुधवारी गोरखगड तर 3 मार्च च्या बुधवारी हडसर पाहून आलो. हडसर साठी आम्ही तिघे जण होतो. जुन्नर जवळील हडसर उर्फ पर्वतगड हा वन डे भटकंती साठी प्रेक्षणीय आणि थरारक आहे. प्रेक्षणीय यासाठी की गडाचा मुख्य दरवाजा आणि त्यापुढील नागमोडी वळत जाणाऱ्या पायऱ्या या कातळात कोरून काढल्या आहेत. पायऱ्यांसाठी रचलेले दगड कुठेही दिसत नाहीत केवळ कोरीव काम. आणि किल्ल्यावरचे मुख्य प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे किल्ल्यावरील धान्य कोठारे.

स्मशानाशेजारील घर

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 13/03/2021 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्मशानाशेजारील घर बऱ्याच लोकांना स्मशान म्हटलं कि घाबरायला होतं. का ते माहित नाही. जिथे कधीतरी जावंच लागणार आहे त्या जागेबद्दल इतका तिटकारा का? जावंच लागणार म्हणजे स्वतः लोकांच्या खांद्यावरवरून नव्हे, कोणाला तरी पोचवायला कधीतरी जावंच लागतं कि. पण हो, स्मशानात कोणाला कधी पोचवायला जायची वेळ येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. म्हणजे तसा प्रसंग कधी कोणावर ओढवू नये. पण असे होणे जवळजवळ अशक्य आहे.

ते तुझ्याचपाशी होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/03/2021 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळत्या झाडावरती किलबिलणार्‍या पंखांनी आणले नभातून जे जे ते तुझ्याचपाशी होते अर्थाचे अनवट कशिदे विणणार्‍या चित्रखुणांना जे जटिल असूनही कळले ते तुझ्याचपाशी होते तार्‍यांच्या मिथककथांचा आकाशपाळणा अडता जे पुरातनाला सुचले ते तुझ्याचपाशी होते
काव्यरस

वर्चुअल वर्ल्ड

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 13/03/2021 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्चुअल वर्ल्ड अनिकेत आणि सुरभी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले ते एका मल्टिनॅशनल कंपणीमधल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी. अनिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि सुरभीचा इंटरव्ह्यू HR डिपार्टमेंटमध्ये होता. इंटरव्ह्यूसाठी थांबले असताना झालेली ओळख दोघांना त्याच कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाढत गेली आणि दोघे कधी प्रेमात पडले ते कळलंच नाही. दोघे दोन वेगळ्या ठिकाणी राहात होते; पण वर्षभरात त्यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि एकत्र राहायला लागले. सुरभी अत्यंत बडबडी होती. त्यामानाने अनिकेत शांत स्वभावाचा. सुरभिचे अकाउंट्स सगळ्या सोशल मीडियावर होते. तर अनिकेत गरज म्हणून फक्त whatsapp वापरत होता.

२. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 12/03/2021 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ? याच दरम्यान त्याची रेव्ह. बोवर (ज्यांनी प्राचीन तामिळ संतकवी थिरुवल्लावूर मद्रासयांच्या थिरुक्कुरल (आव्या / अभंग) चा इंग्लिशमध्ये अनुवाद केला होता) आणि मि. क्लार्कशी (मदुरैचे उपजिल्हाधिकारी होते) यांच्याशी भेट झाली. (मि. क्लार्क खुप वर्षे कोडईकनल इथं, तिथली सुरुवातीची घरे देखील त्याच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली होती.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजवाड्यातून जाताना

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 12/03/2021 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
खालील मेसेज व्हॉट्स अॅप वरून झाले होते. त्यातून या चित्रावर काही भाष्य केले गेले होते तेही सादर... १. Shashikant Oak : मला जास्त आवडले ते जयाजी शिंदे यांच्या शिकारीला जातानाचे पेंटिंग. मनोज दाणी : ho surekh ahe te, hence right at the front एडविन लॉर्ड्स वीक्स यांचे पुर्ण चित्र मनोज दाणींनी मला पाठवले. ३ Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय.

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 4

लेखक राजा वळसंगकर यांनी शुक्रवार, 12/03/2021 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... (a)K2Cr2O7 + (b)H2SO4 + (c)KI → (d)Cr2(SO4)3 + (e)I2 + (f)K2SO4 + (g)H2O काय अर्थ असेल याचा? काय करायचं आहे आपल्याला? ... ************************** गोष्टीचा आधीचा भाग ....