Skip to main content

हरी पुत्तर अँड दी हाफ बेक्ड लॉ सूट ...

लेखक विकास यांनी मंगळवार, 26/08/2008 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक वाचनात बातमी आली... शिर्षक होते: Hari Puttar and the half-baked lawsuit? हरी पुत्तर हे नाव वाचल्यावर रमेश मंत्र्यांच्या "राजू मोरेचे जनू बांडे" आठवले. तर चित्रपटाचे नाव काय? - "Hari Puttar: A Comedy of Terrors" ह्या चित्रपटात हरी पुत्तर लंडनला जातो आणि त्याच्या वडीलांची काँप्यूटर चीप वाचवायचा प्रयत्न करतो वगैरे काहीतरी. (थोडेफार होम अलोन) हा सिनेमा १२ सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे. वार्नर ब्रदर्सनी मिर्च सिनेमाच्या विरुद्ध ह्या संदर्भात मुंबईत खटला भरला आहे.

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 25/08/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती.

अनमोल...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 25/08/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, प्रत्येक गोष्टीला काही किंमत असते, काही एक मोल असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु मंडळी, या जगात अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या केवळ अनमोल आहेत. कितीही पैसे खर्च केले किंवा अन्य कोणताही खटाटोप केला तरी त्या गोष्टींचं मोल ठरवता येत नाही/येणार नाही, त्या केवळ अनमोल असतात. परंतु असंही होऊ शकेल की माझ्याकरता जी गोष्ट अनमोल आहे ती कदाचित इतरांकरता नसेलही! म्हणजेच कुठली गोष्ट मोल करता येण्याजोगी, आणि कुठली अनमोल, हे व्यक्तिसापेक्ष आहे. तर मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीने अशी कोणती गोष्ट आहे की जी वैयक्तिकरित्या आपल्याला अनमोल वाटते?

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 25/08/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

प्रो.देसाई म्हणतात,

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 25/08/2008 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
"जीवनात सतत अडचणी येतच असतात,म्हणून जे काही नशिबात आहे ते होणार असं समजून जर त्या अडचणींचा स्विकार केला,आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या झिडकारल्या तर जीवनात काहीच मिळवलं जाणार नाही. माणसाने स्वतःला परिस्थितीचा बळी झालो असं समजू नये. उलट माणसाने आपली आहे ती परिस्थिती जमेल तेव्हडी स्विकारून आणि त्याचं योग्य कारण पहाण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. माणसाच्या मनात श्रद्धा का असावी?

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

माझे फोटो - सूर्यास्त

लेखक ईश्वरी यांनी सोमवार, 25/08/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझे घर पूर्व पश्चिम असल्याने घरातून सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमीच बघायला मिळतो. सूर्य मावळत असताना संधीप्रकाश असतो तेव्हा आकाश निरभ्र असेल तर लाल , गुलाबी , केशरी रंगाच्या छटा तर फारच सुरेख दिसतात. हा मावळतीचा सूर्य डोळ्यांना नेहमीच सुखावतो.

प्लम सुफले

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 25/08/2008 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा १.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क किवा २ पाकिटे वॅनिला साखर १५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते. १ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठ कृती- बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे.

जय हो

लेखक अमेयहसमनीस यांनी सोमवार, 25/08/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला. यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत. मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, "मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे. हे नियम फक्त आंतरराष्ट्रीय मूर्तीला का? भारतात पर्यावरणाला काही धोका नाही का? अमेय