Skip to main content

कधी सांगु शकलो नाही तुम्हाला......

लेखक चिंतामणराव यांनी गुरुवार, 28/08/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सांगु शकलो नाही तुम्हाला जाणीवा रुंदावत जातांना तुम्हीच प्राम्टिंग करत होता मी मिजाशित टाळ्या घेत होतो विंगेत तुम्ही आनंदाश्रु पुशीत होता कधी बोललो नाही तुम्हाला तुम्हीच तर दिलंत मला स्रुजन सारस्व्ताच भान तुम्हीच ऍकवलंत मला नव्या युगगीतांच उदगान कधी सांगीतल नाही तुम्हाला जीवन म्हणजे अपार श्रद्धा प्रेम, सेवा, कर्तव्य आणि निश्ट्टा खोचलेला पदर आणि यज्ञमग्न हात तुमच जीवन हाच मुर्तिमंत पाट्ट सांगायच राहिलंच तुम्हाला तुम्हीच शिकवलंत, भिमसेनी धबधब्याखाली सोबती गोळा करुन रंगवाव्यात मॅफली झेलाव्यांत सुर तालांच्या आशाडी बरसाती रंग्-रस-गंधांनी भिजवावी मनाची माती कधी कसा आट्टवत नाही पण तुम्हीच
Taxonomy upgrade extras

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 28/08/2008 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते. काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार.

भीती वाटे कुणाला?

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 27/08/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले. अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे.

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

मला आवडलेले पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/08/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात.

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 27/08/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मसाज ...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा... ( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे) हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो.... ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....

भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 27/08/2008 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
तो उठला,पंख झटकले,आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहिर बघत बघत ,थोडासा आळस देत तो बाहेर पडला. सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरिप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडु लागला. स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख्,दिमाखदार तोरा आणि एकुणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेउन, आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातुन आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावु लागला. त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरुन माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.त्या शेकडो माणसांना गिळुन एकदम उंच भरारी घेणार्‍या त्या पांढर्‍या पक्ष्याइतकीच उंची आज ह्यानही गाठली होती.

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

लेखक मनिष यांनी बुधवार, 27/08/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

आम्ही मराठी....

लेखक स्नेहश्री यांनी बुधवार, 27/08/2008 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आपण सर्वा मराठीप्रेमी नेहमी अभिमानाने सांगत असतो की आम्ही हे आणि आम्ही ते. पंण आपल्या बाबतीत हिंदी भाषा बोलण्याच्या बाबतीत मात्र आपण काहीवेळा मार खातो (अर्थात याला अपवाद असतात) आज सकाळी गाडी मध्ये एक-दोन किस्से ऍकायला मिळाले... तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही सांगा... गीता नावाच्य मैत्रिणीने सांगितलेला किस्सा लै भारी होता... तिच्या येथे एका वाड्याचे इमारती मध्ये रुपांतर झाले होते. पण तिकडचे मालक मात्र एकदम साधेसुधे होते.त्यांचा रखवालदार एकदा आल्याआल्या झोपा काढत होता. तेव्हा ते त्याला बघुन चिडुन म्हणाले की "तुम आया बरोबर क्यो सोया था "......