Skip to main content

अग्निप्रलय ?

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 18/09/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
Explosion ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणार्‍या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू.

जाम कोणी देइ

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/09/2008 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************
Taxonomy upgrade extras

त्‍या दोघांची गोष्‍ट-1

लेखक विकी शिरपूरकर यांनी बुधवार, 17/09/2008 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर त्याला ओळखणार्‍यांच्या दृष्टीने चालते-फिरते रेडिओ स्टेशन. थोडासा मुडी म्हणा हवं तर. स्वारी रंगात असली की भरभरून बोलणार, नाहीतर घुम्म. अनेक मित्र-मैत्रिणी असलेला. मात्र तरीही एकटाच. कसल्या तरी शोधात. कदाचित मित्र-मैत्रिणींच्या गराड्यातही एखाद्या हक्काच्या अगदी जवळच्या मित्राच्या शोधात. हं...

मुलींचा अनुशेष

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 17/09/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्‍यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्‍या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे... १. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु).

माटुंग्याचे वामनकाका

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 17/09/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना, "माटुंग्याचे आजोबा" म्हणायचो. नावाप्रमाणे वामनकाका उंचीने "वामनमुर्ती"च होते.शिक्षण एव्हडं तेव्हडंच त्यामुळे उपजीवीकेचं सोपं साधन म्हणजे "आचारी" होणं.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या, कोथिंबीर, मिरची, नारळ, वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही भाज्यांमुळे त्या झोळीचं सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता. पायात चांबड्याची पट्या पट्याची चप्पल डोक्यावर "गांधी "टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा

सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!

लेखक चिन्या१९८५ यांनी बुधवार, 17/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ति: प्रचोदयात् | आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला.

'अप्रकाशित ठेवा' बाबत...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 17/09/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रमैत्रिणींनो, बंधुभगिनिंनो, मिपावर एखाद्या लेखाचे लेखन सुरू असताना ते पूर्ण होईस्तोवर ते अप्रकाशित ठेवण्याची सोय तूर्तास नीट काम करत नसून बंद आहे. सध्या त्या बाबतीत काम सुरू आहे. तरी कृपया पुन्हा ही सोय सुरू होईस्तोवर कुणीही ह्या सोयीचा वापर करू नये ही विनंती. अन्यथा अप्रकाशित ठेवा ह्या सोयीचा वापर करूनही आपले लेखन सर्वांना दिसू शकेल! तूर्तास तरी आपले लेखन वाचवण्याकरता (सेव्ह करण्याकरता) ते लेखन स्वत:लाच व्यक्तिगत निरोप पाठवून जतन करावे व संपूर्ण लिहून झाल्यावरच प्रकाशित करावे ही विनंती... सभासदांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.