Skip to main content

अगम्य...!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 29/09/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे असं काय झालंय?? काल पर्यंत तर सगळं ठिक होतं. आज अचानक हे असं?? काहीतरी नक्की झालयं. मी ही अशी .. अशी कधी होते?? आणि माझं पिल्लू... माझा नवरा?? हे असे.. असे कसे झाले?? कुणी केलं हे असं?? हे स्वप्न तर नाही ना?? काल पर्यंत हे असं नव्हतं. आज अचानक सगळंच वेगळं दिसतं दिसतं आहे. का? नक्की कोण बदललं आहे?? मी, लेक की नवरा?? की सगळेच. अरे हे काय?? माझा चेहरा?? हा असा?? आता मला सगळे काय म्हणतील?? मी अशी नव्हते. अशी कशी झाले? सुंदर नसले तरी दिसायला वाईट नव्हते. आणि आज मी अशी काय दिसते आहे?? एखाद्या जोकरसारखी?? माझे केस? माझे इतके सुंदर सळसळीत केस.. असे काय झाले आहेत?

सुखाचा शोध

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 28/09/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
"सुखी राहण्याच्या परिस्थितीची नुसती इच्छा करून चालत नाही ,किंवा ती परिस्थिती एक नशिबाने घडणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे मनाची समजूत करून चालत नाही." मला वाटतं,आपल्या सुखाची परिस्थिती निर्माण करण्याची आपल्याच अंगात ताकद असते.ही जादू जगात मनुष्य करू शकतो.सर्व साधारण जीवन हे पण एक असाधारण असतं. एकदा,मी माझ्या घरातल्या खिडकीत बसून बाहेर बघत बसलो होतो. "जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे" हे आशाचं गाणं रेडिओवर लागलं होतं.ते गाणे ऐकण्यात तल्लीन असताना मनात विचार आला की आपण किती सुखी आहो.

अर्थशास्त्राची प्राथमिक तत्वे

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 28/09/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थशास्त्रावर नानांसारखी माणसं काही ना काही उपयुक्त माहिती देतच असतात. पण बर्‍याच जणांना (माझ्या सकट) काही संज्ञा / संकल्पना कळत नाहीत. भारतिय रिझर्व बँकेने, सामान्य लोकांना अर्थशास्त्राची प्राथमिक माहिती व्हावी म्हणून एक कॉमिक्सच्या माध्यमातून माहिती देणारा उपक्रम सुरू केला आहे. त्या पैकी एक पुस्तक मला एका मित्राने पाठवले आहे. ते खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करता येईल. http://www.sendspace.com/file/ar2oct वाचा, आणि अजून असे काही साहित्य कोणा जवळ असेल तर जरूर शेअर करा. बिपिन.

छोले भटुरे

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 28/09/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
छोल्यासांठी साहित्य- २ ते २.५ वाट्या काबुली चणे (छोले) ३ मध्यम कांदे+ १ कांदा वरून घालण्यासाठी २ ते ३ टोमॅटो १ उकडलेला बटाटा १/२ चमचा गरम मसाला, १.५ चमचा छोले मसाला, आल्याचा तुकडा २ पेरांएवढा,६/७ लसूण पाकळ्या डावभर तेल, मीठ चवीनुसार, तिखट चमचाभर, मूठभर कोथिंबिर,चाट मसाला कृती - ७ ते ८ तास चणे भिजत घाला, कुकरमधून ३ ते ४ शिट्ट्या देऊन काढा. बटाटा उकडून घ्या. कांदे बारीक चौकोनी चिरा किवा मिक्सर मधून काढा.आले +लसूण वाटा.टोमॅटोही मिक्सर

प्रिय मित्रा!

लेखक नीधप यांनी रविवार, 28/09/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे.... ----------------------------------------- तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही मी मोहरले नक्कीच हे तात्कालिकच आहे अशी समजूत घातली स्वतःची तगमग शांतवण्यासाठी 'का होईना! ओढ तर आहे' अशीही समजूत घातली मनाची सुखवून जाण्यासाठी.. या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे मी कधीच पाह्यलं नाही.

आनंदोत्सव

लेखक जयवी यांनी रविवार, 28/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मन खूप आनंदात असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडतात. म्हणजे सकाळी अलार्म कर्कश्श न वाजता..... नाजूक किणकिणतो..... रात्रीच तयारी करुन ठेवल्यामुळे सकाळी अजिबात धावपळ न होता नवरा, मुलं व्यवस्थित ऑफीसात आणि शाळेत जातात. मनासारखा व्यायाम होतो. आरशातली छबी सुद्धा बरीचशी बारीक दिसते. तसं हे एकुलतं एक कारणही ब्रम्हानंद द्यायला पुरेसं असतं ती गोष्ट वेगळी ;) आवडत्या मैत्रिणीचा फ़ोन चांगला तासभर चालतो. "सेल" ची बातमी कळते. झक्कपैकी स्वयंपाक होतो. मनसोक्त आंघोळ होते. टिव्हीवरही आवडते कलाकार मनोरंजन करतात. इतकंच काय तर नव-याचा ऑफिसमधून खास फोनही येतो.

लघुपाककृतीस्पर्धा निकाल

लेखक गणा मास्तर यांनी रविवार, 28/09/2008 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्वप्रथम लघुपाककृती स्पर्ध्येमध्ये भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे हार्दीक आभार. प्रथम पारितोषिक आरती मुग डाळीचे कबाब साहित्य : १ कप मुगाची डाळ, कप उकडलेला बटाटा (मळून), थोडा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे मिर्चि पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा आल-लसूण पैस्ट, १ चमचा चाट मसाला, २ चमचे कोथिंबीर, चवीपूरता मीठ. कॄती : निवडून, धूऊन मुगाची डाळ ऊकडून घ्यावी. त्यात उरलेले बाकीचे साहीत्य नीट मिसळून घ्यावे. मग त्याचे लहान लहान गोळे करावे.

भरती-अहोटीच येणं

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 28/09/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
भरती-अहोटीच येणं ===================== रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... लाटांच्या झुल्यात.. मनाच झुलणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... रेतीच्या किल्ल्याचं.. सागरी बुडणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... विखुरती चांदी.. हलकेच झेलणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... उमटल्या खुणांच.. तळाशी रहाणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... खार्‍या लोटात.. खळाळून हसणं..! रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं... लाटांच्या ओठी.. जीवन गाण..! ===================== स्वाती फडणीस.................... २००६
Taxonomy upgrade extras

महाराष्ट्र वैभव.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 28/09/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले. महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर. महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले. महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे. महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.

मम सुखाची ठेव...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवी असलेल्या तात्या अभ्यंकरांच्या या वेड्यावाकड्या ओळी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण...!
मम सुखाची ठेव....
ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं! ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....! षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा, अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार.. तो तर तिच्या गळ्यातच आहे...! नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभूत्व हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...! कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी, स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध, परंतु दोघेही तिचेच