Skip to main content

अमरवाणी

लेखक घासू यांनी बुधवार, 08/10/2008 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्रा॑नो, गेल्या दोन दिवसा॑च्या बातम्या॑मधे सारखे अमरसि॑ग या॑च्याबद्द्ल दाखविण्यात येत आहे. त्या॑नी जी मागणी केली आहे कि, दिल्लीतील एन्काउ॑टर खोट आहे आणी त्याची चौकशी व्हावी त्याला माझा आणी प्रत्येक भारतीयाचा तीव्र निषेध आहे. आज अमरसि॑हाना त्या अतिरेक्याचा पुळका येत असेल पण त्या॑नी केलेल्या त्यात क्रुत्यात जे मरण पावले त्या॑च्या कुटु॑बिया॑च दु:ख अमरसि॑गाना दिसत नसेल. अशा राजकारण्या॑ना उर्फ देशद्रोह्या॑ना भर रस्त्यात उलट टा॑गुन फटकावल॑ पाहीजे. शहिद मोहनच॑द शर्मा या॑च्या कुटु॑बिया॑नी अमरसि॑गानी दिलेली मदत नाकारली त्याबद्द्ल मला त्या॑चा अभिमान आहे.

विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 08/10/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते- थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई)..... सळई नाही घेवू शकली जीव..... यमाची सळई, साई माघारी पळवी...... एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी. ( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.

भ्रष्टाचार आणी आपण . . . .

लेखक सुक्या यांनी बुधवार, 08/10/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर सध्या अनुभवांचे पेव फुटले आहे. तेव्हा माझाही एक अनुभव .. मिपा वर माझे हे पहीलेच लेखन आहे तेव्हा चु.भु.दे. घे. :-) मिपा वर फिरता फिरता असाच एक कौल दिसला. "मिपा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल". कुणाचीही प्रतीक्रिया नसनारा अन एकुन ५ मते मिळालेला तो कौल साधारण कुनी मनावर घेतल्याचे दिसले नाही. भ्रष्टाचार हा सर्वांचाच एकंदर जिव्हाळ्याचा विषय आणी रोजच्या जिवनाचा अविभाज्य घटक. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहे या वाक्याला आमच्या घरातले उंदिर सुध्धा घाबरत नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी तसा जहाल मतवादी.

निरवानिरव

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/10/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या अप्राप्य , गोलगुबार स्तनांकडे बघत बसलेला भणंग माणूस अचानक हातउसनं मागेल काहीतरी. असाही मी परत येणार नाही. ******* आडगावच्या एका फलाटावर फतकल मारून बसलेल्या म्हातार्‍या बैलासारखं. माझं आयुष्य स्थिरावलं आहे. चिरस्थायी. ************** एव्हाना माझ्या आठवणी. ठेवणीतल्या बुरसट वासासहीत, ट्रंकेच्या तळाशी. घडीघडीत विरलेली घडी. इथेतिथे गंजाच्या लाल डागासहीत. पसरत गेलेल्या आयुष्याच्या मापात कपडे आता अडनिडे. तशी तू समजूतदार हवी असलेली जरीची तार. बंदीस्त केली असशील मनातल्या हुशार रीळावर. दिलंच काही बोहारणीनी विनीमयात तर चार चकचकीत डब्यांची रांग साक्ष देईल, टुकीनी
Taxonomy upgrade extras

आंतरजालावरील करामती...

लेखक टुकुल यांनी बुधवार, 08/10/2008 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर अनुभवाचे वारे सुरु असल्यामुळे आमचाही अनुभव. ------------------------------------------------------------------------------------ अभियंत्रीकीच शिक्षण संपुनही नोकरी लागत नसल्याने घरीच पडुन होतो, त्यामुळे इकडच तिकडच वाचन चालु होत आणी बरच नवीन शिकायला हि मिळत होत. अथक प्रयतनाने शेवटी लागली नोकरी आणी आंतरजालाचा संबध वाढला. हे चालु असताना, मित्रांना येणार्‍या मेल्स बद्द्ल कुतुहुल वाटु लागले, खास करुन मुली संगणकावर बसुन गोड गोड हसत काहीतरी खरडत, तेव्हा कुतुहल जरा जास्तच.

नील कशकरी

लेखक अभिजीत यांनी बुधवार, 08/10/2008 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.treas.gov/organization/bios/kashkari-e.html http://blogs.wsj.com/deals/2008/10/06/meet-neel-kashkari-the-man-with-t… अमेरिकी सरकारच्या ७०० बिलियन डॉलर बँक बेल-आउट प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी भारतीय वंशाचे नील कशकरी यांची नेमणूक झाली आहे. अमेरीकी अर्थ खात्यात ते गेल्या २ वर्षापासून कार्यरत आहेत.

आकाशातून पृथ्वी

लेखक चित्रा यांनी बुधवार, 08/10/2008 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार नक्की कुठचा निवडायचा कळला नाही. पण आत्ताच काही छायाचित्रे पाहिली. Yann Arthus-Bertrand या छायाचित्रकाराने पॄथ्वीची आकाशात उंचावरून घेतलेली छायाचित्रे न्यूयॉर्क येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. ह्या चित्रांचा आकार ४ x ६ फूट एवढा असणार आहे. ती इतर काही पाहिलेल्या आकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या चित्रांपेक्षा काहीशी वेगळी आणि सुंदर वाटली म्हणून मिपाकरांसाठी इथे देते. मूळ दुव्यावर जाऊन पहावीत.

इतिहासाचा साक्षीदार - कुलवंत रॉय यांची काही छायाचित्रे..

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 08/10/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला इमेल आली, जी मला खूप इंटरेस्टींग वाटली म्हणून इथे देत आहे.. (मिपाच्या धोरणात बसतं का हे? बसत नसेल तर अवश्य काढू शकता.. ) ही सगळी बातमी इथे वाचता येईल..

फाऊंटन पेन!

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 08/10/2008 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
हाता मधलं फाऊंटन पेन! झरझरणारे थेंब थेंब.. काळी-नीळी लाल-जांभळी हिरवी-पिवळी सळसळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झुळझूळणारे थेंब थेंब.. खळखळणारी खरखरणारी खदखदणारी भळभळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झिळमीळणारे थेंब थेंब.. वळती थांबती वहाती चिरतीमुरती रेघ हाता मधलं फाऊंटन पेन! झगमगणारे थेंब थेंब.. झरझर ताना झुळझूळ ताना झिळमीळ ताना झिरपती रेघ ======================= स्वाती फडणीस.................. ०८-१०-२००८