Skip to main content

वेळ

लेखक अनिरुध्द यांनी बुधवार, 15/10/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ आली वेळ झाली मनुजा सांगून गेली काळ आहे बदलला झटपट कामाला लागा संप आणिक दगडफेक झाले ते रोजचेच बॉम्बस्फोटही पचवण्याची आम्हास आता सवय झाली नेते आमुचे बसले नुसते मस्ती त्यांना खुर्चीची सामान्यांना असते चिंता इथे रोजच्या खर्चाची सगळे असती इथे सारखे मरणा-यांचे नशीब सारखे किती गेले, किती राहीले, अतिरेक्यांनी काय साधले निष्क्रीयतेने बघतो आपण चला करुया आज एक पण वेळ आता आली क्रुतीची एकजुटीने लढण्याची बघू नका जात-पात गुंफून हातात हात एकदिलाने सारे लढू शत्रुस त्या दूर पळवू छत्रपतींचे आम्ही सैनिक राष्ट्राचे ही आम्ही पाईक राष्ट्र आमचे, देश आमचा अभिमान आम्हां तिरंग्याचा वेळ आली, सांगून गेली ऊठ आत
Taxonomy upgrade extras

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

(अशीही एक) कोजागिरी

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 15/10/2008 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
आलेत एकाच दिवशी पूर चांदण्यावरच्या कवितांचे चंद्र,भरती नि शब्द - भलतेच गेलेत वरती म्हणायचे! कोजागिरीला हवा कशाला बिलियन्स् चा बेल्-आउट्? ****************** मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी भरतीपण मग आली असती सांगेन तश्शी - नेमक्या वेळी भेळवाला बघा मराठी, 'भैयाची भेळ' आउट्! ***************** दाट सायीच्या पडद्याआडून गोड चेहरा दिसला असता (हाती ग्यालन् 'फॅट्-फ्री'चे, अन् विचारसुद्धा पातळ नसता) कुण्याकाळची याद कुणाची छळे अशी थ्रूआउट् *****************

मिसळपाव आणि साबूदाण्याची लापशी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 15/10/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या तेंव्हा या लिखाणावर फारशी चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिपाचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली.

प्रतिभा म्हणजे काय असते ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 15/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.

             राम-राम मंडळी, मिपावर जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो. कवीला एखादी कल्पना सुचते कशी ? याबाबत कायमच कुतूहल असते. दैनंदिन जीवनव्यवहारात तुम्ही आम्ही जे शब्द वापरतो तेच शब्द वापरुन एखाद्याला कवितेसाठी नेमके शब्द सुचतात. ती कविता एक वेगळा अनुभव आणि  आनंद देते.

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/10/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याला जोडून ठेवीत असतं.

बालकं - खलिल जिब्रानच्या मुक्तकाचा अनुवाद

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 14/10/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी विनायक प्रभूंच्या एका समुपदेशनाच्या लेखात प्रतिक्रिया देताना मी खलिल जिब्रानच्या एका इंग्लिश मुक्तकाचा उल्लेख केला होता. विप्रंनी त्याचा अनुवाद करुन देता का म्हणून विचारणा केली होती. बरेच दिवस त्याला हात घालीन म्हणत होतो आज थोडी सवड मिळाली आणि मी त्याच्या माझ्या परीने भावानुवाद केलाय तो मिपाकरांसाठी सादर आहे. जिब्रानने व्यक्त केलेले विचार मला पटलेत आणि माझ्या मुलाशी वागताना ते मला पदोपदी जागेवर आणायचे काम चोख करत असतात!

प्रिय कोकिळा

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कोकिळा :SS रंग नाही , रुप नाही नाही पक्षाची राणी तरी अमुल्य ठेवा आहे तुझियाकडे ज्याने तु प्रसिध्द आहे ठायी-ठायी तुझिया गाणे ऐकताना थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी रंग रुप यांवर मिरवणे अशी आहे रित जगाची पण गुण-हुशारी यावर जग आधारित तु आहेस आदर्श याचा एक सामान्य असली तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं रंग नसला - रुप नसले तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं..........
Taxonomy upgrade extras

नशीब

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 14/10/2008 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
१. चंद्रकिरणात समुद्राच्या वाळूवर सळसळणार्या माडांच्या विक्राळ सावल्या, अन् चमचमणारी एक मासोळी, तडफडून क्लांत थिजलेल्या, असाह्य डोळ्यांनी दिपस्तंभाचे ते मार्ग दाखवणारे लांबच लांब हात पहात शेवटच्या लाटेच्या प्रतीक्षेत . . . . २. मी विक्रमादित्य, एक मतदार सत्तांध, मतलबी वेताळाला दर पाच वर्षांनी खांद्यावर घेऊन येतो विकासाच्या लालसेपोटी . . . खोटया आश्वासक गोष्टी सांगून, मलाच कोड्यात पाडून वेताळ हवेत विरुन जातो मलाच बेरोजगारी, दारिद्र्याच्या अकाली स्मशानात टाकून . .