उकडलेले अंडे!
हो, तुम्ही शीर्षक बरोबर वाचलेत. उकडलेल्या अंड्याच्या पाककृती(!) बद्दलच लिहितोय :-)
आता असा प्रश्न पडणे साहजिक आहे की एवढ्या साध्या गोष्टीची कृती कशाला लिहायला पाहिजे! आणि गूगलबाबाला विचारले तर चिक्कार रेसिपी आहेत.
तर, असो!
अंड्याचे बरेच प्रकार खूप आवडतातच. पण बहुतांश पदार्थ बाहेर जसे जमतात तसे घरी जमत नाहीत. सर्वांची आवडती 'बुर्जी'; कितीही प्रकारे करून बघितली तरी यष्टी स्टॅन्ड बाहेर मिळणाऱ्या टपरी वरची चव नाहीच येत. तीच गोष्ट 'poached egg' नावाच्या विंग्रजी प्रकारची. मला प्रचंड आवडतो पण घरी जमलंच नाही. माझ्या मते 'super fresh eggs' हे सोडून बाकीचा सगळा जुमला मी केला तरी पण नाही जमले!
मिसळपाव