Skip to main content

पंजाबी सामोसा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/10/2008 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम जर्मनांचे बटाट्यावर फार प्रेम आणि इथे उत्तरेतून आलेली मंडळी बरीच,ती ही,हॉटेल व्यवसायातील! त्यामुळे इथे सामोसा लोकप्रिय व्हायला वेळ नाही लागला. आमचे मित्र ख्रिस आणि सुझानही सामोसा प्रेमी..काल दिवाळीनिमित्त ते दोघं जेवायला आले होते.

दिवाळीतले चमत्कार-२

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
भुजबळांची `भाऊबीज' -------------- दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले होते. छगन भुजबळांच्या घरी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ थांबली नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या चाहत्यांना, समर्थकांना थोपवणं आता अवघड झालं होतं. विशेषतः साठीचा कार्यक्रम झाल्यानंतर ही गर्दी वाढलीच होती. ""अहो, चला! आज दिवाळीतलं शेवटचं स्नान आहे ना, लवकर उटणं लावून घ्या....'' पत्नीनं आठवण करून दिली, तसे भुजबळ जरासे सावरले. ""अगं, हे कार्यकर्ते थांबतील, तेव्हा उठणार ना?'' भुजबळ चिडचिड्या स्वरात म्हणाले. ""मग त्यांना आवरायला सांगा ना!

दिवाळीतले चमत्कार-१

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाराजी का `राज' ----- अभूतपूर्व रोषणाईने "कृष्णकुंज' गजबजून गेले होते. संपूर्ण परिसराला "मनसे'च्या झेंड्याच्या पताका लागल्या होत्या. सगळीकडे फटाके वाजत होते. जल्लोष सुरू होता. महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेले हजारो कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत होते. आज खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, "मनसे'च्या कर्तव्यनिष्ठतेचा विजय झाला होता. मराठी राष्ट्रपतींनी खास अध्यादेश काढून महाराष्ट्रातून सर्व बिहारींना, उत्तर भारतीयांना, मध्य प्रदेशींना, गुजरातींना, बंगालींना, पंजाबींना हाकलून देण्याचा आदेश काढला होता.

तर !

लेखक मयुरेशवैद्य यांनी सोमवार, 27/10/2008 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.bhojpuria.com/samachar/news.php?a=5691 वरील दुव्याबद्दलची बातमी आज एका चॅनलवर होती. ह्या लेखात बिहारींनी मुंबईतून पळून न येता तिथेच प्रतिकार करायला हवा होता वगैरेची भाषा केली आहे. वर कहर म्हणजे, राज ठाकरेंवर प्रत्येक घरातून निदान एक तरी कोर्टकेस दाखल करण्याचाही सल्ला दिला आहे. आजच बिहारचे सर्वदलीय मंत्री राजच्या विरोधात पंतप्रधानांना भेटणार आहेत. एक बिहारी युवक ( हो .. तो बिहारी आहे, म्हणजे तो गुंड नसणारचं मग तो बंदूक घेऊन लोकांना मारण्याची धमकी देत बसमध्ये फिरला तर काय झालं ?

पहाट

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 27/10/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras

चष्मा !

लेखक चाफा यांनी सोमवार, 27/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे सुध्दा तुम्ही चष्म्यासकट वाचत असाल तर माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे आहेत. गेले कित्येक दिवस या चष्म्याने मला नकोसे करुन टाकलेय. रात्री एकतर झोपच लागत नाही नाहीतर स्वप्नात चष्मा येउन मला जाग येते. काम करताना उगीचच नजर अधु झाल्यासारखी वाटते. समोर कुणी चष्मा लाउन बसलेलं असेल तर माझं लक्ष कामातुन निघुन तिकडे जातं आणि मग झालेल्या चुका शोधताना डोळ्यांच्या मदतीला चष्मा नसतो. मुळात या चष्मा प्रकरणाचा शोध कुणी लावला? जगातल्या नक्की कोणत्या व्यक्तीला `जगातला पहीला चष्मिष्ट' अशी प्रसिध्दी मिळाली?

आंतरजालावरील वाचनीय..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, दिवाळीच्या मुहूर्तावर "आंतरजालावरचे वाचनीय" हे एक नवीन सदर सुरू करण्यास मिसळपावला आनंद होत आहे.. आज मनोगत, उपक्रम, मायबोली, अनेक मराठी ब्लॉग्स, इत्यादी मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले जात आहे. मग ती एखादी उत्तम कविता असो, एखादा ललितलेख असो, किंवा एखादी वाचनीय व माहितीपूर्ण चर्चा असो.. आपल्यातले काही मिपाकर हे मिपासोबतच आंतरजालावर इतस्तत:ही फिरत असतात.

नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 27/10/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ? नाडी ग्रंथांच्या ताडपत्रावरील मजकुराबाबत चर्चेचा विषय लाऊन धरलेला काही वाचकांचा अपवाद सोडता फारसा विचारात घेण्यासारखा किंवा वैचारिकतेने आनंददायी वाटत नाही. याचे कारण म्हणजे त्यांची ज्योतिषशास्त्राबाबत नकारात्मक मते आहेत. त्यांच्या वैचारिक बैठकीमुळे फलज्योतिषाला वा अन्य भविष्यकथनाच्या विधांना विरोध करणे स्वाभाविकपणे घडते. अशा मनोधारणेतून त्या लोकांना नाडी ग्रंथ हे भविष्यकथनाचा प्रकार असल्याने ते थोतांड असणार असे खात्रीपुर्वक वाटते वा मानावेसे वाटते. त्यामुळे या विषयावर अनेकांच्या अपेक्षित प्रतिक्रिया आल्या.

सावध रहा.........

लेखक वेताळ यांनी सोमवार, 27/10/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईसलैड्,पाकिस्तान,हंगेरी,अर्जेंटिना,बेलारस,युक्रैन आदी देशानी दिवाळखोरी जाहिर केलेली आहे.आर्थिक संकट जगावर खुपच गडद होत चालले आहे. नवीन गुंतवणुक करताना विचारपुर्वक करावी.पैसा बचत करणे ,दैनदिन खर्चात काटकसर करणे आदी गोष्टीवर भर द्या. पाकिस्तानात ४५ रुपये किलो गव्हाचे पिठ झाले आहे.अल्ला त्याना सदबुध्दी देवो. सनातन्याला आनंद झाला असेल वेताळ

पहा पटलं तर!!!!

लेखक धोंडोपंत यांनी सोमवार, 27/10/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आपण सर्व मराठीप्रेमाने बांधले गेलेलो आहोत. त्यामुळेच आपण मिसळपाववर येतो. वाद घालतो, भांडतो, चेष्टामस्करी करतो, कविता ऐकवतो, विचार मांडतो, आनंद लुटतो. आपणा सर्वांना येथे एकत्र आणणारा धागा म्हणजे महाराष्ट्रावरील आणि मराठीभाषेवरील आपले प्रेम. किंबहुना मिपाकरांचा उद्देशच मुळी ज्यांना मराठीत संवाद साधायचे आहे, त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे हाच आहे. जो जो महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम करतो, तो मराठी. त्याचा धर्म कोणताही असो. त्याच्या घरात जर मराठी भाषा बोलली जात असेल तर तो मराठी. विविध धर्मीय लोक महाराष्ट्रात आहेत. जे मूळचे महाराष्ट्रातीलच आहेत.