Skip to main content

दोन कविता

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 31/10/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर जरी पिऊनी आता झालास तू बेहोष.. शोषून फुलांचे सारे जरी मधुकोष .. हा व्यर्थ तुझा आवेश, तुझा हा अंध.. पाकळया फुलांच्या तुजसाठी झाल्या बंद रुसलेले गीत रुसले गीत शब्दात अडखळे शब्द ओठावर ये ऊन झाले ते नि:शब्द येऊन तळमळे अधरावरती गाणे नशिबात कळीच्या निर्माल्याचे जिणे

शोभा डे: मुंबई आणि बॉम्बे

लेखक मराठी माणूस यांनी शुक्रवार, 31/10/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
शोभा डे यांची करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतची ट्रान्स्क्रिप्ट इथे देत आहे. मूळ मुलाखत इंग्लीशमधून असल्याने इंग्लिशमध्येच ठेवत आहे. जर मिसळपावच्या कोणी सदस्याने ही भाषांतरीत केली तर बरे होईल. मी स्वतःच करायचा प्रयत्न करत आहे पण त्याला थोडा वेळ लागेल म्हणून आत्ता आहे अशी... Devil's Advocate: Shobhaa De on Mumbai vs Bombay Karan Thapar / CNN-IBN Published on Mon, Oct 27, 2008 What’s wrong with Mumbai? A city known for its cosmopolitan culture has become a victim of parochial, divisive identity politics.

बाई मी "दळण' कांडिते!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 31/10/2008 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
----------- भडक लाल रंगाचे कपडे घालून एकता कपूर तिच्या गिरणीत नेहमीप्रमाणे कामात दंग होती. मधली एक गिरणी फारच अवाढव्य होती. एखाद्या ऑटोमोबाईल कारखान्यात शोभावी, अशी. या गिरणीवर एकता कपूर स्वतः काम करत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची वेगवेगळी पिंपं शेजारी मांडली होती. मनास वाटेल त्या पिंपात माप घालून त्यातून धान्य काढून ती गिरणीच्या तोंडात ओतत होती. काही मिनिटांत त्यातून सकस, रसरशीत पीठ खालच्या पिंपांत पडत होतं. या भल्यामोठ्या आवारात शेजारीच रांगेत, ठराविक अंतरावर पंधरा-वीस गिरण्या मांडल्या होत्या. त्यांच्यावरही एकतासारख्याच दिसणाऱ्या काही बाया कार्यरत होत्या. या एकताच्या "डमी'.

भोक

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 31/10/2008 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलगा विचित्र वागतोय, तुमच्या लक्षात नाही आलं का? सकाळी चहा देता देता आमचे कुटंब वदले. रोज हे वाक्य ऑफिसमधे कानावर पड्तेच आता घरी सुद्धा तेच का हा प्रष्न मनात आला. मी विचित्र तर माझा पण विचित्रच असणार, मी एक क्षिण विनोद केला. तो काय बोलतोय ते कळतच नाही.(मि.पा. सदस्य झाली की काय ?मनात कुशंका) म्हणजे काय? निट सांग. अहो, गिजर दुरुस्त करायच नाही म्हणतो. एवढच ना.- मी. अहो तुम्ही एवढी कवतिकाने कॉलेजला जायला गाडी दिली तर हा बस ने जातो म्हणतोय. आणखी काय,- मी कपडे पुर्ण असल्याशिवाय वॉशिंग मशिन लावायला देत नाही. ए.सी. पंधरा मिनिटात बंद करतो.

श्रद्धा हाच मानवी जीवनाचा महत्त्वाचा ऊर्जास्रोत असतांना रामसेतूचा विध्वंस का ?

लेखक सनातन यांनी शुक्रवार, 31/10/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा हा मानवी जीवनाच्या अनेक ऊर्जास्त्रोतांमधील एक महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत आहे. याला डावलून कोणतेच सामाजिक शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. या ऊर्जेने मानवी जीवन सुखी होण्यास अथवा आलेली दु:खे भोगण्यास मदत होते. विज्ञानाची इच्छा, त्याचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठीच आहे. विज्ञान हे एक माध्यम आहे, ते ध्येय नव्हे. ध्येय तर समाजाचे जीवन अधिक आनंदी करणे हेच आहे व असलेही पाहिजे. यासाठी त्या समाजाला काही घटना, काही वस्तू, वास्तू व व्यक्‍ती उपयुक्‍त ठरतात. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी सत्तेतील काहिजन त्यांच्या सहकार्‍यांसह धिंगाणा घालत आहे व रामसेतू उद्ध्वस्त करून श्रद्धांवरच घाला घालत आहे.

मिसळपावासंबंधी एक बातमी - (संपादित केले आहे)

लेखक संकेत यांनी गुरुवार, 30/10/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण वादविवाद वाढवणारी आणि चुकीची माहीती देणारी लिंक असल्याने बातमी संपादित केली आहे.

मुलीला आपली आई माहित हवी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 30/10/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते. असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं, " असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?" त्यावर ती म्हणाली, "आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.?

जॉली

लेखक निखिलचं शाईपेन यांनी गुरुवार, 30/10/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो ... कथा प्रकाशित करायला .. मिपावर काही तांत्रिक ..अडचण आहे.... तरी सध्या इथे वाचा आणि कळवा ... नंतर पोस्ट करतोच आहे.. इथे.... http://purwant.blogspot.com/2008/10/blog-post.html निखिल

मग मी असा ..शांत ...

लेखक निखिलचं शाईपेन यांनी गुरुवार, 30/10/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stODs/s1600-h/mag+me+asa+shant.JPG किंवा ...क्लीक करा.. http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stO… OR http://purwant.blogspot.com/ फोटो नी कविता एकत्र यावी म्हणून ..लिंक टाकली आहे. -निखिल
Taxonomy upgrade extras