Skip to main content

रम्य एका सकाळी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 01/11/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक काल्पनिक कविता.... रम्य एका सकाळी तु वेचित होतीस बकुळी अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी तुला पाहुन मावळणारा चंद्र जरा थबकला ढगांच्या गावाक्षातुन हळु हळु डोकावू लागला जेव्हा तुझी चाहुल लागली रवीराजांची तर झोपच उडाली धुक्याचा पडदा बाजुला सारुन स्वारी लगेच बघु लागली तुझ्या गुलाबी गालांना बघुन भुंगा सुद्धा फसला गुलाब समजुन गालांना क्षणभर विसावला तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................
Taxonomy upgrade extras

बार-ऍट-लॉ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 01/11/2008 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती. सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही. "अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीतराहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली." मी त्याना म्हाणालो, "तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?" "तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 01/11/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही. पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा.

डियर हंटींग अमेरिका भाग -१

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 01/11/2008 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात, माझ्या काकांबरोबर शिकारीसाठी भरपूर हिंडलो आहे. जंगलातही खूप भटकंती केली आहे.दसरयाच्या आसपास भातशेती कापणीला आली की, काकांना हमखास बोलावणं येई. भातशेतीची नासाडी करणारया रानडुकरांचा बंदोबस्त करायला. काकांबरोबर शिकारीला ,त्यांच्या गावातली माणसं उत्सुक असायची, कारण काका कधीच काही खात नसत. फक्त शौक म्हणून शिकार करायचे. त्यामुळे शिकार झाल्यावर आपल्याला मेजवानी मिळणार ह्या विचाराने, कोणीही तयार व्हायचं. मी त्यांच्याकडे असलो की मी पण जात असे भटकायला..... पण हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे, इथे अमेरिकेत सध्या डिअर हंटींग चा मोसम चालू आहे. दरवर्षी ,ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यांत असतो.

चेरी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 01/11/2008 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा १.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध २ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर चेरी ५०० ते ७५० ग्राम - काचेच्या बरणीत अथवा टीनमध्ये शुगरसिरपमध्ये असलेल्या आंबटगोड चेरी मिळतात त्या घ्याव्या.

हिंदू दहशतवाद

लेखक कवटी यांनी शनिवार, 01/11/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवाद तसा भारताला नविन नाही. गेली कित्तेक वर्ष आपण दहशतवाद पहातोय्/झेलतोय. कुठेही दहशतवादी हल्ले झाले, बाँबस्फोट झाले की "दहशतवादी कुठल्याही जातीचा/धर्माचा नसतो, दहशतवाद हाच त्याच धर्म" असे सांगणार्यांची चढाओढ लागते. मात्र गेले काही दिवस मालेगाव बाँबस्फोटा बद्दल अटक झालेले साध्वी प्रज्ञा, मेजर उपाध्ये आणि कुलकर्णी यांचा उल्लेख विविध वाहिन्यांवर सतत "हिंदू-दहशतवादी" असा केला जातो. ते दहशतवादी आहेत वा नाहीत हा विषय वेगळा.

आंदोलनाचे विधायक (?) मार्ग . .

लेखक सुक्या यांनी शनिवार, 01/11/2008 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे काही दिवस मिपा वर राज ठाकरे अन त्यांचे आंदोलन या विषयावर बर्‍याच गरमागरम चर्चा झाल्या. बरेच वेगवेगळे विचार अन मते समजली. एकंदरीत सर्व बाबतीत दोन गट पडले. एक गट राजचे आंदोलन हे योग्यच आहे असे म्हणत त्याला आपला पाठींबा दिला तर काहींनी हे आंदोलन योग्य आहे परंतु पध्द्त चुकिची असे मत नोंदवीले. काहींनी हे जे होतयं ते पुर्ण चुकीचं आहे, भारतात कुणालाही कुठेही जाण्याचा पुर्ण अधिकार आहे असे वाटते. या सर्व उहापोहात पध्द्त चुकिची असेल तर हे आंदोलन मराठी माणसाने कशा तर्‍हेने करावे यावर काहीही प्रतिक्रिया आल्या नाही.

जात नाही ती जात....मागून पूढे

लेखक सातारकर यांनी शनिवार, 01/11/2008 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
अजून शंभर वर्षानंतर जात, धर्म आणि वंश या गोष्टींची स्थिती काय असेल? भारतीयांच्यापुरता विचार केला तर, यातले जात आणि धर्म आपण घट्ट कवटाळून आहोत. या तिन्ही प्रकारांच अस्तित्व वेगवेगळ्या पातळीवरती असल तरी ह्या तिन्ही प्रकारांच्या आधारे आखलेल्या सीमारेषा धुसर होताना मात्र एकाच पातळीवरती आणि एकाच वेळेला होत आहेत. धर्माच्या बाबतीत सांगण थोड अवघड आहे कारण नागरिकरणाच्या (civilisation ला दुसरा शब्द सुचला नाही) प्रक्रीयेत बरीच वेगवेगळी स्थित्यंतर सहन करित आणि बय्राच स्थित्यंतरातून जात धर्म आजच्या अवस्थेत पोचले आहेत. जातीच्या बाबतीत विचार करताना तो फक्त भारतीय द्रूष्टीकोनातून करावा लागतो.

विडंबन - सांग सांग भोलानाथ

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी शनिवार, 01/11/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय? Investors ना बख्खळ divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय? Investors ना बख्खळ Divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ...
Taxonomy upgrade extras

मिपा ओळख

लेखक चेतन यांनी शनिवार, 01/11/2008 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत.