Skip to main content

फॅशन

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 04/11/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या मुर्हुतावर प्रर्द्शीत झालेला मधुर भांडारकर दिग्द्र्शीत चित्रपट आहे फॅशन चित्रपटाचे कथानक हे फॅशन इड्स्ट्री भोवती फिरते आहे हा मधुर भांडारकरचा अजुन एक चांगला चित्रपट आहे त्याचे या अगोदर्चे चांदणी बार, सत्ता, कॉर्पोरेट आणी ट्राफिक सिग्नल हे सुध्दा चांगले चित्रपट होते मधुर भांडारकर एक वास्तववादी दिग्दर्शक आहे यात शंका नाही आपलि या चित्रपटा बद्दल ची मते कळवा वास्तववादी चित्रपट वेडा कोतवाल?

येथे..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 04/11/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे. करतात मग कशाला भलताच तर्क येथे. लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले. अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे. निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

ओंजळभर पाणी

लेखक हर्षदा विनया यांनी मंगळवार, 04/11/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळभर पाणी खूप तहान लागलीये, हो ना? ह्म्मं..मलाही, या वाळवंटात, चल,आपणच खोदूया एक विहीर, आपल्या दोघांसाठी,खोल-खोल.. मी माती सारते बाजूला थोडी, मग तूही सार माती थोडी, मग मी सारेन मोठाला दगड, तूही कर तसंच,अगदी तसंच.. आलटून-पालटून, आळीपाळीने, आपण सारत राहू एकेक सगळं खूप खोल खोल जाण्यासाठी.. मग कूठेतरी लागेल ओलावा, उत्साह दूणावेल आणि तहानही.. अचानक हाताला लागेल थोडंसं पाणी, अगदी थोडं-थोडकंच हं...!!! उडवून पाहीन मी ते पाणी, तूझ्या नाक,गाल, ओठांवर, शहारशील तू कदाचित, अचानक, पण ओठ जरा जास्तच हपापतील.. तूझा उजवा हात दे अन माझा डावा घे, बनवू आपण 'दोन' हातांची 'एक' ओंजळ, दोन हातांची नि दोन जीवांची
Taxonomy upgrade extras

व्यसनमुक्ती

लेखक निमीत्त मात्र यांनी मंगळवार, 04/11/2008 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्‍टर बॉब स्मिथ. खरे तर यापूर्वी मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहिले जाई (आज ही बरेचजण मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहतात) त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात. पण समानतेच्या पातळीवरून त्यांना कोणी समजून घेत नव्हते.

माझी मराठी फिल्लम -बाजी

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 04/11/2008 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना येणारी सध्याची दूरावस्था लक्षात घेता, मराठी चित्रपट उद्योगाचे पूनरज्जीवन (खरे तर पूनरुत्पादन, पूण्यवचन असे भारी भरकम शब्द आठवत होते. पण त्यातल्या त्यात अधिक अगम्य शब्द लिहीलाय 8} ) आम्हीही मायबोली मंडळाच्या वतीने मराठी चित्रपट काढायचा योजला आहे. कथानक तयार आहे. फक्त अर्थ पूरवठा (सरकारी अनूदाना व्यतीरिक्त) आणि प्रेक्षक पूरवठा झाला की चित्रपट लगेचच मूक्त (रीलीज हो) करू.

ओबामा आणि काश्मिर

लेखक विकास यांनी मंगळवार, 04/11/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ओबामा हा जरी आजपण मला योग्य उमेदवार वाटत असला तरी त्याने जी काही काश्मिरसंदर्भात मुक्ताफळे उधळली आहेत ती पहाता त्याचे भारताबद्दलचे धोरण हे पाकीस्तानावंबी असणार असे दिसत आहे: Barack Obama's Kashmir thesis! यात म्हणल्याप्रमाणे त्याने आत्ता एमएसएनबीसीला दिलेल्या मुलाखतीतच हे मत दिले आहे असे नाही तर सुरवातीपासून तो याच पद्धतीने बोलत आहे की, "पाकीस्तानची जर अफगाणिस्तानमधे" मदत होणे हवे असेल तर "काश्मिर प्रश्न भारताने सोडवला पाहीजे.

डियर हंटींग अमेरिका भाग -२ ( आणि शेवटचा!!)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 04/11/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.>> पहिला भाग इथे वाचा शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते.

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग २ (आणि शेवटचा!!)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 04/11/2008 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो.......>>> पहिला भाग इथे वाचा तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे.

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली. ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का? (लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे.
Taxonomy upgrade extras

विशेष सूचना..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 04/11/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मी आणि माझा संत ज्ञानेश्वर" या लेखानंतर बर्‍याच जणांनी विचारलं होतं की, हा कार्यक्रम पुन्हा कधी ऐकायला मिळेल. त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम इप्रसारण ने या आठवड्यात पुन्हा प्रसारीत केला आहे. आज (सोमवार) पासून येत्या रवीवार पर्यंत कधीही हा कार्यक्रम आपण इप्रसारण वर ऐकू शकाल. - प्राजु