वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!
नमस्कार मंडळी,
एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला!
आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात.
म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.
काळ्या पिशवीत पिशवीत
श्री चतुरंग ह्यांचे 'होता खमंग, होता चकणाहि खास बाकी' हे विडंबन वाचले.
Taxonomy upgrade extras
आमची मुंबई
Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे.
कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे.
जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही.
हे करण्यासाठी Wikipedia वर आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागतील.
१. Wikipedia वर खाते तयार करा (ह्याची सक्ती नाही, ह्याशिवायदेखील काम होत. पण त्या वेळेला आपल्या संगणकाच्या IP ची तिथे नोंद होते)
२.
आम्ही पेट्स ठेवतो !
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!!
साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास आढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ.
टीव्हीवरचे महाभारतकार बी. आर. चोप्रा यांचं निधन
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित निर्माते - दिग्दर्शक आणि छोट्या पडद्यावर महाकाव्य ' महाभारत ' साकारणारे बलदेव राज चोप्रा, उर्फ बी.आर.चोप्रा यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
आज सकाळी जुहू येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बी. आर. चोप्रा यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. चोप्रा यांच्या मागे, मुलगा निर्माते रवी चोप्रा आणि दोन मुली शशी आणि नीना असा परिवार आहे. सध्याचे आघाडीचे निर्माते यश चोप्रा हे बी. आर. चोप्रा यांचे भाऊ आहेत.
अर्थ काय ह्याचा?
कळीने कधी विचारला
अर्थ उमलण्याचा?
फ़ुलाने कधी दाखवला
स्वार्थ जपणुकीचा?
उषा पुन्हा निघून गेली
पुसून लाली रंगांची
नाही क्षणही थबकली
वाट पहात टाळ्यांची
निर्झरांना कधी मिळाला
आस्वाद मधु जलाचा?
पाखरांना कधी समजला
आवेग तृप्त करण्याचा?
आईने कधी का केला
कंटाळा भरवण्याचा?
अर्थ कधी ना पुसला
बाळाच्या लाथांचा.
Taxonomy upgrade extras
ओबामा अध्यक्ष झाले
आत्ता इथे रात्रीचे १० वाजतायत. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. आतापर्यन्त झालेल्या मतमोजणीत त्यांना २८३ इलेक्टोरल वोट्स मिळाली आहेत. सर्व न्यूज चेनेल्सनी ओबामांना विजयी घोषित केले आहे. अध्यक्ष होण्यासाठी २७० इलेक्टोरल वोट्स मिळावी लागतात.
भूमीका
घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला.
"अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल.
गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली.
"चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे"
गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.
मिसळपाव