Skip to main content

तुम्हाला काय वाटते?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 07/11/2008 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता म.टा. चाळत असताना "महाराष्ट्राबाहेर एकही परीक्षा जाऊ देणार नाही!" ही बातमी वाचण्यात आली. हे उद्गार अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आहेत :-) बाकी त्यांचे राजकारण अथवा राज्य चालवण्याची पद्धत (?) मला मान्य नसली तरी त्यांचे हे वाक्य कुठेतरी पटले: "महाराष्ट्रात मध्यंतरी परप्रांतियांना मारहाण झाली, अनेक उद्योग बंद पडले. पण, ते सुरू करण्यासाठी स्थानिक कामगार मिळाले नाहीत. आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही!

रगडा पॅटीस

लेखक आकांक्षा यांनी शुक्रवार, 07/11/2008 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः (२ जणांसाठी) पॅटीस करिता :३ उकडलेले बटाटे, हळद, मीठ, रवा. रगडया करिता : २ वाटया उकडलेला हिरवा वाटाणा, १ मोठा टोमॅटो, १ मोठा कांदा, बारिक केलेला आल - लसुण (अंदाजे), मीठ, फोडणी साहित्य, तेल, लिंबाचा रस (आवडीनुसार), चिंच खजुर चट्णी, दही. सजावटीसाठी: बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि बारिक शेव. कृति: प्रथम बटाटे कुसकरुन घ्यावे. त्यात मीठ, हळद घालावे व मळून घ्यावे. उभे चप्पट असा आकार देऊन कटलेट सारखे बनवुन घ्यावे. कढई मध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाका, तडतडली की त्यात कांदा टाका, गुलाबी झाला की बारिक केलेल आल लसुण टाका, मग टोमॅटो टाका. थोड परतुन घ्या.

बिहार-१.

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 06/11/2008 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बिहार या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजवर बिहारच्या संदर्भात असलेल्या माहितीचे आदान प्रदान व्हावे या हेतुने हा लेख प्रपंच करत आहे. माहितीत त्रुटी असेल तर ती कळविणे / दुरुस्त करणे. (स्वैर विचार मंथन आहे.) १.भारत आणि पाकिस्तान यात काय साम्य आहे असे जर विचारले तर अनेक साम्यस्थळांपैकी एक साधर्म्य म्हणजे बिहारीची या देशात समान असलेली स्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदाजे १० लाख बिहारी मुसलमान पाकिस्तान मध्ये विस्थापित झाले. तेथील स्थानिक जनतेने त्यांना मुजाहिद ( परके) असा ठप्पा लावला आणि पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाणी लोकांनी त्याना कधीही आपलेसे केले नाही.

तर तुम्ही काय निवडाल????

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 06/11/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
अस समजा कि सध्या तुम्हि खाजगी नोकरी (खालिलप्रमाणे) करत आहात, आणि अचानक तुमच्याकडे सन्धि चालुन आलिय ति सरकारी नोकरीचि.......... अटी: सरकारी नोकरी पगार----१८०००/- कामाची वेळ ----- ८ तास कि खाजगी नोकरी पगार----२५०००/- कामाची वेळ ----- १० ते १२ तास तुम्हि या २ पर्यायापैकि कोनता निवडाल ? आणि का ??????? आपला लाडका, उम्मि.

नमस्कार मन्ड्ळी,

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 06/11/2008 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला सान्गा, मार्केट ७५०० पर्यत खाली गेलेल, आणी त्यानन्तर १०५०० पर्यत वरही गेल........... हे नेमक कोणामुळे झाल? डोमेस्टिक बायर मुळे कि फ़ोरेन सन्स्थामुळे?? आणि आता परत खाली का येतय??? पुन्हा विक्रि सुरु झाली का???? बहुतेक हे अल्प सन्तुषट आपले भारतियच असावेत. आपला लाडका, उम्मि.

प्रिय पंडितराज

लेखक व्यंकु यांनी गुरुवार, 06/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रिय पंडितराज जगन्नाथ', सप्रेम नमस्कार 'वेगळं व्हायचंय मला' हे तुझ्या तोंडून ऐकताच मी 'झोपी गेलेला जागा झालो' आणि 'जणू काही कट्यार काळजात घुसली' 'माझी बायको माझी मेव्हणी' यांनी मला सावरलं पण मला प्रश्न पडला कि 'या चांगल्या घरात असं झालंच कसं' एवढं मोठं घर श्रीमंताचं असं व्हायला नको होतं असो. 'सिमेवरुन परत जा' असं तु मत्स्यंगंधेला का म्हणालास? उलट तु तिला प्रेमाने म्हणायला हवं होतं 'प्रेमा तुझा रंग कसा?' त्या दिवसापासून ती 'घराबाहेर' पडली आणि सगळीकडे 'बायको पळाली माहेरी' अशी बोंब झाली.

एका प्रेतयात्रेचा सोहळा आणि आमच्या वारशाची जपणूक

लेखक सुनील यांनी गुरुवार, 06/11/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका संपन्न आणि आधुनिक विचारांच्या देशातील सुसंस्कृत समजला जाणारा समाज, हा आपल्याच धर्मातील पण वेगळ्या पंथातील लोकांना कितपत हिणवू शकतो? त्यांची कितपत निर्भत्सना करू शकतो? ५ नोव्हेंबर हा दिवस उभ्या इंग्लंडमध्ये गाय फॉक्स डे (Guy Fawkes day) म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होते. परंतु, दक्षिण इंग्लंडमधील लूइस (Lewes) ह्या छोट्याश्या गावात मात्र हा दिवस एका आगळ्यावेगळ्या पद्ध्तीने साजरा होतो.

हा स्पंद फुलण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 06/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

लेखक शिंगाड्या यांनी गुरुवार, 06/11/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)