Skip to main content

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

सैतानाचे मनोगत

लेखक येडा खवीस यांनी मंगळवार, 02/12/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
( नेहमी देव श्रेष्ठ आणि दानव वाईट हेच गृहित धरले जाते आणि त्याचं प्री-फोर्मेटेड विचारातुन आपण आपलं आध्यात्म पुढे चालवतो.. हे कितपत खरं आहे ते माहित नसतानाही सतत केवळ देव श्रेष्ठ आणि दानव वाईट याच भुमिकेत आपण रहातो त्यामुळे कधीतरी एकदा "तिकडची" बाजु काय आहे ते जाणुन घेण्याची इच्छा झाली....आणि हे सुचलं...बघा कसं वाटतय तुम्हाला, पटतय का?) जर हे मनोगत वाचल्यावर तुम्हाला मी यातुन देवांविषयी वाईट वक्तव्ये केली आहेत असं वाटलं तर मी आधिच क्षमा मागतो.

अंडे मे अंडा

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 02/12/2008 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
हायवेच्या पाप्पाजीच्या धाब्यावर खाल्लेली , ही एक निराळीच अंडाकरी आहे. पांथस्थासारख्या बल्लवाने माझ्या पाकॄ चे फोटो पिकासावर पाहून ह्यातील एखादी मिपावर टाक असे कॉम्प्लिमेंट्स दिल्याने धीर करत आहे. इथे एक सो एक सुगरणी आणि खवय्ये असताना आपण काही पाकॄ मिपावर टाकायची म्हणजे अंमळ धीराचं काम. तरीसुद्धा..... साहित्य २ कांदे फोडी चिरुन २ टॉमेटो फोडी चिरुन ३अंडी उकडून १ कच्चे फेटून तेल ( घ्याल तसे) ३-४लसूण पा़कळ्या बोटभर आले २ मिरच्या २ चमचे गरम मसाला / कांदा लसूण मसाला २ चमचे धने- जीरे पावडर १ चमचा लाल तिखट मीठ किंचीत साखर कोथिंबीर कॄती कढईत तेल गरम करा.

या १७ अनामिक बळींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळेल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनामिक आणि बेवारस अवस्थेत मुंबईत शवागारात पडून असलेल्या या अतिरेक्यांच्या १७ बळींचे चेहेरे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कसे पोहोचू शकतील? आणि फक्त याविषयीची बातमी प्रसिद्ध करून मटा का थांबले आहे? त्या वृत्तपत्राला (किंवा नको तेंव्हा investigative journalisitc spirit दाखविणार्‍या वाहिन्यांना) ही छायाचित्रे घेण्यास व प्रसिद्ध करण्यास काही कायद्याच्या अडचणी आहेत काय? मुंबईतील कोणी मिपा कर त्या शवागारात जाऊन त्यांच्या चेहेर्‍यांची छायाचित्रे घेऊन प्रसिद्ध करू शकतील का?

हे भारतात होईल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.

हसावे की रडावे

लेखक शक्तिमान यांनी सोमवार, 01/12/2008 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांचा आणि तेथील तथाकथित सुरक्षातज्ञांचा चाललेला भारताविरूद्धचा प्रचार पाहून हसावे की रडावे हेच कळेना. पहिल्यांदा हा कुठला तरी विनोदी आणि विडंबनात्मक कार्यक्रम असावा असे वाटले.

रद्द सत्र

लेखक कवटी यांनी सोमवार, 01/12/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, राजिनामासत्रा नंतर आता रद्दसत्र सुरू झालेले दिसतय. क्रिकेट दौरे तर आधीच रद्द झालेत. आता ठिकठिकाण्चे उदघाटन समारंभही रद्द होउ लागलेत. (आमच्या २ क्लायंटनाही फटका बसला. त्यांचे बाहेरदेशहून येणारे पाहुणे ताजमधेच उतरणार होते. त्यानी आता यायचे पुढे ढकलले.). अत्ताच आलेल्या बातमी नुसार रत्नागीरीचे साहित्यसम्मेलन रद्द करण्यात आलेले आहे. याच धरतीवर अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन रद्द करावे काय? आपल्या भावना काय आहेत?

मिपा वर नवीन सदराची आवश्यकता : इस्लामचे सत्य स्वरुप व इतिहास, व भारतीय व पाक उर्दू वृत्तपत्रातील मुख्य उतारे (कानोसा)

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 01/12/2008 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
इस्लामचा इतिहास त्याचे सत्य स्वरूप इ. बाबत मिपा चे अनेक सद्स्य खूप गोंधळ्लेले दिसतात त्यासाठी खास या विषयाला वाहिलेले सदर सुरु करावे. "मुस्लीम मनाचा शोध" या शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा त्यांच्या अनुज्ञेने संदर्भ घ्यावा. याबाबत प्रथम कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे.