Skip to main content

संवेदना!!

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
संवेदना!! =================================== शुष्क.. निबर काळी.. बोथट खपली.. बघितली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या मुरमाड जमिनी सारखीच दिसते.. राठ! जखमेचा रसरसता लाल रंग लपवणारी.. जागच्या जागी गोठलेली.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..! कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी.. ही तर फक्त खपलेली... कातडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा हसेल.. संवेदना!! मिरवेल वीरश्री!!!.. =================================== स्वाती फडणीस..... ०३-१२-२००८
Taxonomy upgrade extras

संत-सत्पुरुषांच्या सामाजिक योगदानाचे निकष

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 18/12/2008 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सत्पुरुषांचे कार्य काय? अथवा अमुक एका संताने समाजासाठी काय केले? अश्या तर्‍हेचे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. आपण जर कुणा सत्पुरुषाला, संताला मानत असू, पूजत असू तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. याबद्दल थोडा उहापोह करावा आणि आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने हा चर्चा प्रस्ताव मांडत आहे. समाज कार्य म्हणजे अनेकदा समाजाचा भौतीक विकास करण्यासाठी प्रयत्न असे वाटत असते. तर दुसरा एक पैलू म्हणजे मानसिक-भावनिक-शारिरीक पातळीवरची मदत. समुपदेशन, वैद्यकीयसेवा, स्वच्छता वगैरे साठी प्रबोधन इत्यादी. या सेवा समाजातल्या व्यक्तींना सरळ दिसतात आणि त्या नोंद करण्याजोग्या सुद्धा असतात.

जिम

लेखक भिडू यांनी गुरुवार, 18/12/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जिम मधे (म्हणजे माझी नाही, मी ज्या जिम ला जातो ती) एक से एक नमुने आहेत. एक मुलगा आहे त्याच्या सर्व वस्तू ब्रॅंडेड असतात्,त्याचे कपडे,शूज सोडा,घाम पुसायचा नॅपकिन पण 'नाईके' चा आहे. त्या मानाने व्यायाम यथातथाच करतो. दुसरा एक जण तर पुर्ण नटुन थटुन येतो.डोक्याला हेड बँड(केस डोळ्यावर येतात म्हणॅ),हाथाला रीस्टबँड,कानात आयपॉड्,हाथात ग्लोवस्,पायाला नी पॅड्.(नशीब abdomen guard, चेस्ट पॅड घालुन येत नाही ते).अजुन एक बाई आहे(चांगली जाडजूड आहे). एके दिवशी ती चक्क कॅमेरा घेवुन आली आणी ट्रेनर ला म्हणाली कि माझा ट्रेड मिल वर धावताना फोटो काढ.

गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी

लेखक अनंत छंदी यांनी गुरुवार, 18/12/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
व्यंकूचा भयकथेचा धागा पाहून मनात एक विचार आला. आपल्यापैकी कित्येकांचा भूते असण्यावर विश्वास नसेल तर कित्येकजण छातीठोकपणे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, परिचितांना भुताटकीचा अनुभव आल्याचे सांगतील. तर असे काही अनुभव असतील तर लिहा. काल्पनिक भयकथेपेक्षा हे अधिक रोमांचक वाटतील.

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग २

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 18/12/2008 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु. पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता. असो.

खमंग,खुसखुशीत,खुमासदार थालिपीट...आणि पौष्टिकसुद्धा...

लेखक स्मिता श्रीपाद यांनी गुरुवार, 18/12/2008 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
१.पावसाळ्याचे दिवस आहेत....आपण मुसळधार पावसातुन भिजत भिजत नुकतेच घरी आणि त्यातही माहेरी...पोचलो आहोत...आता २ दिवस माहेरी आराम म्हणून आपण जाम म्हणजे जाम खुष आहोत ...कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत :-) बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे (ह.ध्या.)...आज शुक्रवार आहे ...म्हणजे आता २ दिवस मज्जा :-) ..आपण घरात येतो..मस्त फ्रेश होउन कपडे बदलतो....आणि आई भूक असं ओरडत स्वयंपाकघरात घुसतो....आणि गरम गरम...वाफाळत्या..खमंग थालिपीटाची डिश हातात येते :-)... २.मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत...आपण पहाटे पहाटे ( प्रत्येकाने स्वतःला झेपत असलेली वेळ वाचावी ..)मस्त फिरुन वगैरे आलेलो आहोत (कधी नव्हे ते .

अपवाद

लेखक पॅपिलॉन यांनी गुरुवार, 18/12/2008 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
पल्याडचे गवत नेहेमीच अधिक हिरवे वाटणार्‍यांच्या गर्दीत, एकनिष्ठ सहजीवन अंगिकारणारे नेहेमीच अपवाद असणार. आपले कोमल हात, विशाल पर्वताच्या गळयात लडिवाळपणे टाकून, त्याच्याशी प्रियाराधन करणार्‍या नदीला, सागराची धीर-गंभीर गाज मोह घालते आणि ती पर्वताला सोडून, सागरात विलीन होण्यासाठी, बेभान, बेधुंद होऊन धावत सुटते. प्रियकराला सोडून आपल्या कुशीत आलेल्या पुष्ट सरितेला पाहून समुद्रही सुखावतो पण तोही अधून्-मधून चकवा देणार्‍या चंद्रिकेच्या पाशात अडकतो. पूर्ण यौवनाने मुसमुसलेल्या पौर्णिमेच्या रात्री तर तो धीर सोडून उचंबळू लागतो! त्या एकाकी तळ्याच्या कोपर्‍यात ते हंसद्वय मात्र एकमेकांत गुंतलेले
Taxonomy upgrade extras

ढगाला लागली कळ...

लेखक धम्मकलाडू यांनी गुरुवार, 18/12/2008 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला आदरणीय दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातली 'ढगाला लागली कळ...' हे अप्रतिम गीत देवनागरी लिपीत हवे आहे.... कृपया इथे कुणी देऊ शकेल का ? आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो. या अप्रतिम गाण्याचा रसास्वाद करून दिल्यास मी आभारी राहीन. गांधीवादाचा किंवा संघवादाचा वैचारिक प्रभाव या गाण्यावर कसा आहे किंवा नाही हेदेखील सांगावे.

ठाणे ' मिपा ' कट्टा (३)

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी गुरुवार, 18/12/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
येवां !!!! कट्टा आपलाच असां. ५.०० चे ६.०० वाजले तरी चालतील. फक्त सगळे वेळेत जमले म्हंजे जास्ती मजा येईल एव्हढंच . मी लिहिलेच आहे की कट्ट्याला वेळेचे बंधन नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चारवांतर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 18/12/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
चारवांतर = चार ओळी अवांतर मी टोमणा मारला नाही मी अपमान हि केला नाही मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी अवांतरपणा केला नाही ! महाकवी टारवांतर आमची प्रेरणा :- मी मोर्चा नेला नाही मी संप हि केला नाही .... कवी (?) संदीप खरे
Taxonomy upgrade extras