Skip to main content

वैधानीक इशारा.

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/12/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वाटेवर इथून पुढे जरा जपून. तरबेज प्रेमी पण हलकेच पाउल टाकतात. दिवसाउजेडी. रापलेले भोई पण घाबरतात पालखी वहायला या वाटेवर. ती, फुलदाणी तो चंद्र ती शिशी ग्राईप वॉटरची. ते तांबडे तावदान तो आयना ती काकणं ते सगळं काही जे फुटतं लाखो बधीर तुकड्यात. विकीरान्नासारखं. ते डंख करेल टाचेखाली. हलकेच. साप्ताहीक भविष्यासारखं. सहज.निर्धोक. वरवर चाळता. चालता ? जरा जपून अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेसच जोर धरतो.
Taxonomy upgrade extras

मुतलुलुक- ब्लिस

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुतलुलुक- ब्लिस हे एका तुर्की चित्रपटाचं नाव.परदेशी चित्रपटाचं नाव योग्यवेळी आठवणं, त्याचा योग्य उच्चार समजणं, तो समजल्यावर तो योग्य पध्दतीनं करता येणं हा सगळा नव्याने शाळेत जाण्यासारखा अनुभव असतो. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या (आणि दरवर्षी नेमाने होणाऱ्या)थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला उदघाटनाचा मान मिळाला होता. मुतलुलुक चित्रपटाच्या पहिल्याच चौकटीत दिसतं एका निर्मनुष्य तळ्याच्या काठी कुशीवर पडलेलं एका वयात आलेल्या मुलीचं शरीर.चित्रपटाची नामावळ चालू होते आणि कॅमेरा तिच्यावर आवर्तनं घेत आणखी वर जाऊन दृष्याची पार्श्वभूमी उलगडत असताना, तळ्याचा निर्मनुष्य परिसर दाखवत असताना मुलीच

पाणि

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit.
Taxonomy upgrade extras

नवे वर्ष , नवे सन्कल्प

लेखक गीत यांनी शनिवार, 27/12/2008 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
:) अजुन बरोबर ४ दिवसांनी नवीन वर्ष चालु होईल्.दर वर्षी आपण काही ना काही तरी नवीन सन्कल्प करत असतो . कधी ते पुर्ण होतात तर कधी नाही ( बरेचदा ते पुर्ण होत नाहीतच :) ) तरी आपण परत पुढच्या वर्षी नवीन जोमाने नवीन सन्कल्प करतो. तर असेच आपल्या पैकी अनेक जणांनी काहीतरी सन्कल्प केले असतील , आपल्याला ते शेअर करायला आवडेल का ?

महीन्याभरात

लेखक विकास यांनी शनिवार, 27/12/2008 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी २६ डिसेंबरच्या (बॉस्टनच्या) रात्री लिहीत आहे. महीन्याभरापूर्वीची अशीच रात्र आठवत आहे. अस्वस्थता काय असू शकते हे नको इतके समजले. पुढचे ३-४ दिवस बाकी सर्वकाही सुरळीत चालू असले तरी मुंबई एके मुंबई अशी अवस्था डोक्यात घर करून राहीली होती आणि आतल्या आत त्रागा होत होता. हे अतिरेकी असे का वागतात म्हणून हा त्रागा नव्हता, तर एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे, दुसरीकडे सागरी चाचांची नाकेबंदी करणारे आपण इतके कमी कसे पडतो या विचाराने हा त्रागा होता. दहशतवादी दहशतवादच करणार पण त्याला आपल्याकडे तात्काळ उत्तर नव्हते ह्याने आपल्या राज्यकर्त्यांची आणि नोकरशाहीची वास्तवीक मान लाजेने खाली जायला हवी...

एक लाडीक कविता

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/12/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही मोगरा माळला असं वार्‍यानी सांगावे. आम्ही फुलं घेउन यावं तुम्ही केस मोकळावे. हे असं काय होतं बुवा ?....... तुम्ही केस मोकळावे त्यात चांदणं गुंफावे. आम्ही सोडून निश्वास चार काजवे मोजावे. अशी रात्र कशी जावी.... तुम्ही पान नखलावं इथं लागावी सुपारी. तुम्ही आळस मोडावा आम्ही उसण धरावी. कशी जीवघेणी अदा..... आम्ही लपत छपत लाडे सलगी करावी. तुम्ही घेउन पदर रात्र जाहीर करावी. अस्सा जीव सुखावला......
Taxonomy upgrade extras

मसाला आम्लेट-पोळी रोल

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 26/12/2008 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १. अंडी २. बारीक चिरलेला कांदा ३. चिरलेला टोमॅटो आणि मश्रुम्स ४. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर ५. हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ कृती: १. कांदा, टोमॅटो, मश्रुम्स, मिरची आणि कोथिंबीर मिक्सिंग बोउल (मी बीर मग वापरला आहे!) घ्यावे २. थोडी हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकावे. ३.

आणखी एक कुळकर्णी

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 26/12/2008 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव, मलाही तुमच्याप्रमाणेच "कुळकर्णी'अनुभव आला आहे. तो असा- माझ्या घराच्या माडीवर एका कुळकर्ण्याचं घर होतं. त्याचे वडील सर्कल होते. माझ्या आणि त्याच्यात चारएक वर्षांचे अंतर असेल. लहानपणी (पाचवी) मी त्याच्याकडे शिकवणीस जात असे. आमची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. (याची त्याला पुरेपूर कल्पना होतीच) त्यामुळे त्याची त्यावेळची वीस रुपये फी द्यायला उशीर व्हायचा. पण तो पैशांसाठी इतका जेरीस आणायचा की कधी वाटे नको ही शिकवणी. त्याने पैसे मागितले की आम्ही आपले बापूस समोर हात पसरयचा. आज नाहीत, उद्या बघू, असे उत्तर ठरलेले असे. मग दुसऱ्या दिवशी मुकाट शिकवणीला जाऊन कोपऱ्यात बसायचे.

मराठी टायपि॑गसाठी मद्त

लेखक जयेश माधव यांनी शुक्रवार, 26/12/2008 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपण मि.पा.वर ज्याप्रमाणे मराठी टाइप करतो त्याच प्रकारे माक्रोसॉफ्ट वर्ड,पॉवर पॉइ॑ट्,फोटोशॉप मध्ये टाइप करु शकतो का? पा॑पारिक पध्दत खुपच क्लीस्ट वाट्ते.कोणी काही सुचवु शकतो का? जयेश माधव