तुम्ही मोगरा माळला
असं वार्यानी सांगावे.
आम्ही फुलं घेउन यावं
तुम्ही केस मोकळावे.
हे असं काय होतं बुवा ?.......
तुम्ही केस मोकळावे
त्यात चांदणं गुंफावे.
आम्ही सोडून निश्वास
चार काजवे मोजावे.
अशी रात्र कशी जावी....
तुम्ही पान नखलावं
इथं लागावी सुपारी.
तुम्ही आळस मोडावा
आम्ही उसण धरावी.
कशी जीवघेणी अदा.....
आम्ही लपत छपत
लाडे सलगी करावी.
तुम्ही घेउन पदर
रात्र जाहीर करावी.
अस्सा जीव सुखावला......
वाचने
9458
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
लाडीक आहे खरी.
+१
In reply to :-) by धनंजय
सहमत.
+२
In reply to +१ by घाटावरचे भट
सहमत.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
:-)
मस्त.
कविता आवडली.
मला खूपच आवडली हि कविता
छान आहे
वेगळी
एकदम आगळी वेगळी आणि ताजीतवानी वाटणारी कविता. पाचव्या ओळींमधे काव्यरंजना मधून अचानक वास्तवात आणुन सोडल्यामुळे रोलकोस्टर सारखी मजा आली.
तुम्ही पान नखलावं हा शब्दप्रयोग नखांनीच गुदगुल्या करून गेला.
आणखी असे प्रयोग येउ द्यात.
हम्म...
काही खरं नाही...
सह्हीच. लाडीक म्हणजे किती लाडीक! लाडे लाडे आदबीनं तुम्हा विनवते बाई... अशीच अगदी.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
रामदास
रामदास जी,
खूप छान, लाडीक, मोहक आहे ही कविता.
आवडली!
:)
एकदम सही -
ये सही है, भिडू!
हे पण.
चांगली कविता.
कविता संग्रह
कविता संग्रह का प्रसिद्ध करत नाही हो तुम्ही.
१. लाडिक
२. माडिक
३. ताडिक
असे ३ भाग असावेत. प्रकाशक मी बघतो.
आणि पडिक? --
In reply to कविता संग्रह by विनायक प्रभू
आणि
पडिक?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
सडिक
सडिक म्हणायाचे आहे का तुम्हाला.
१६६ प्रतिसाद घेणा-या. निरुद्योगी लोकांना तेवढेच काम.
वादपटु खुश.
तुम्ही
तुम्ही घेउन पदर
रात्र जाहीर करावी.
अस्सा जीव सुखावला......
च्यामारी,, लय लाडीक बरं का... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
रामदासराव!
रामदासराव!
कविता लै भारी. जियो..!
भारी
कविता फार आवडली.
मस्तच ---- सख
मस्तच
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
खूप सुंदर
खूप सुंदर कविता.
तुमच्या कविता नेहमीच वेगळ्या असतात.. नानांच्याही तशाच असतात!
मस्त लिहिलेत!! येऊ द्यात अजून :)
मुमुक्षु
झकास कवीत...
मस्तच आहे कवीता....आणि नावही समर्पक आहे :-)
खरंच लाडिक कविता आहे
>> तुम्ही मोगरा माळला
असं वार्यानी सांगावे.
आम्ही फुलं घेउन यावं
तुम्ही केस मोकळावे.
>>हे असं काय होतं बुवा ?.......
आय हाय... क्या बात है !
(तुम्हाला हे कसं सुचलं बुवा !!) :)
------------
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....
+१ सहमत
In reply to खरंच लाडिक कविता आहे by संदीप चित्रे
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....
अगदी असेच म्हणतो!
(खुद के साथ बातां : रंगा, हा रामदास भलताच लाडिक खिलाडी दिसतोय बरं का! ;) )
चतुरंग
एक अप्रतीम कविता!
खूपच सुंदर! :)
आयला
वर आणल्याबद्दल धन्यवाद.
हि कविता खरच फार लाडाची आहे आमच्या.
रामदास हा आयडी किती जणं मिळून
रामदास हा आयडी किती जणं मिळून चालवतात?
सगळीकडंच उत्कृष्ट!