धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - २ (अंतिम)
अंबेजोगाई - धर्मापुरी रस्ता सिमेंटचा बनत असला तरी रस्त्याचे काम ब-यापैकी झालेले आहे. एका तासात आम्ही धर्मापुरीला पोहोचलो. किल्ला गावाच्या मध्यभागी, थोड्या उंचीवर आहे. खरंतर याला किल्ला न म्हणता गढीच म्हणणं योग्य ठरेल. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात छोटा किल्ला असावा.
प्रत्यक्ष किल्ला ब-या स्थितीत असला तरी किल्ल्याला लागून असलेला परिसर आणि किल्ल्यात शिरण्याच्या वाटेवर मात्र काटेरी झुडुपे उगवलेली आहेत. अस्वच्छता अर्थातच आहे. शिवाय काही गावकरी किल्ल्याचा वापर हागनदारी म्हणूनही करत असावेत.
मिसळपाव