Skip to main content

उभ्या उभ्या विनोद (अर्थात स्टँड अप कॉमेडी)

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 20/01/2009 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्र/मैत्रिणींनो.... न्यू जर्सीतील आम्हा काही जणांचा एक उभ्या उभ्या विनोद करणारा संघ आहे :) मध्यंतरी आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनच्या निधी उभारणी साठी साधारण सव्वा तासाचा एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 'तू नळी'वर उपलब्ध आहेत. ह्या ध्वनि-चित्रफितीमधे चुकून माझे नाव 'सुरेश' असे दिसते पण नवीन चित्रफीत मिळाली की हा दुवा बदलीन. सादरकर्ते -- अनुक्रमे --
  • शुभदा कामेरकर
  • प्रशांत गिजरे
  • सुरेश जोशी
  • वैशाली फणसे
  • विनय देसाई
  • अस्मादिक !!!
तर

(परिकथेतील राजकुमारा ...)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 20/01/2009 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच वंदना विटणकर याचे परिकथेतील राजकुमारा हे सुरेल गीत ऐकल आणि संध्याकाळी आम्हाला 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला' अ.शे.मोगलगिद्दिकर यांचे ऐतिहासीक दस्ताऐवजांचा आभ्यासपुर्वक रुमाल वाचायला मिळाले..

मिठाचे काय आहे!

लेखक शशिधर केळकर यांनी सोमवार, 19/01/2009 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे घरात एक वाक् प्रचार मोठ्या गमतीदार रीतीने रूढ झाला होता - मिठाचे काय आहे! त्याचे असे झाले, की एक दिवस वडील दौर्‍यावरून रात्री उशीरा परतले. त्याना आम्ही मुले काका म्हणत असू. जेवायला रात्री खूप उशीर झाला. साधाच बेत जेवायला - मुगाची खिचडी आणि कढी! पहिला घास काकानी घेतला, आणि चेहर्‍यावरची घडीही न बदलता आईला म्हणाले, "जरा मिठाचे पाहू!" आईला काय प्रकार झाला आहे ते लगेच लक्षात आले, नि ती म्हणाली, "अय्या, मीठ घालायचेच राहिले!" काका म्हणाले, "असू दे, वरून घेऊ, तसे काहीच बिघडले नाही; घाईघाईत होते असे कधीकधी!" पण लक्षात असे आले, की वरून घेतले, तरी 'ती' मजा काही खिचडीला येईना!

विनोद - देव आजारी आहे(देवाची तब्येत ठीक नाही.)

लेखक विनोद कोकने यांनी सोमवार, 19/01/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
विनोदः-आज्जी आज देव पुजेची घन्टी हळुहळु वाजव. आज्जी: का रे विनु? विनोदः-देवाची तब्येत ठीक नाही वाट्त. आज्जी: चुप काहीतरी बड्बडु नको. विनोदः-काहीतरी नाही , खरच सा॑गतो.अग शेजारचे Doctor म्हणे देवाघरी गेले.

लग्न झालेल्या मुलींनी माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य ?

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 19/01/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथेप्रमाणे लग्न झाल्यावर मुलींनी सासरचे आडनाव लावावे हा रितिरिवाज आहे. पण आजकाल लग्न झाले तरी माहेरचे आडनावच विशेषतः राजकारणात ( माहेरच्या आडनावाचा ) फायदा घेण्यासाठी मुली लावतात. सध्याचे उदाहरण १) प्रिया दत्त २) पुनम महाजन हे कितपत योग्य आहे ( मुन्ना भाईने राजकीय फायदा उचलण्यासाठी आजच पत्रकार परिषदेत यासंबंधी मत व्यक्त केले आहे ) आपल्याला काय वाटते. मुलींनी लग्न झाल्यावर फक्त माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य? माझ्यामते सासर- माहेर दोन्ही आडनावे लावण्यास हरकत नसावी उदा.

विनोद चे विनोद

लेखक विनोद कोकने यांनी सोमवार, 19/01/2009 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक pregnant बाइ doctor कडे जाते Doctor : कितवा महिना?? बाई: आठ्वा Doctor : मी कसा आठवू??

मिपा करांची एकमेकांस पत्रे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 19/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कुटुंबिय. सदर लेख हा विनोदनिर्मिती करुन तुम्हाला घटकाभर हसवण्यासाठी लिहिला आहे. कोणावरही वैयक्तीक शेरेबाजी वा टिंगल करणे हा उद्देश नाहिये. १% वास्तवाला ९९% कल्पनेची तर्री मारुन हि मिसळ बनवलेली आहे. कोणास ह्या लेखनामुळे वाईट वाटले, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला गुन्हेगार' समजुन माफी करावी.

कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी

लेखक मिंटी यांनी सोमवार, 19/01/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या शनिवार - रविवार कोकणात जाण्याचा योग आला..... हो नाही करता करता एकदा जायचं पक्कं केलं आणि शनिवारी रजा टाकुन निघालो....सकाळी ६.०० ला घर सोडलं...जायचं होतं हर्णे गावात....आणि २ दिवसात हर्णे, केळशी आणि अंजर्ले फिरुन आम्ही महाबळेश्वर मार्गे पुण्यात यायचं असं प्लॅनिंग होतं......जाताना भोरमार्गे वरंध घाटातुन जाऊयात असं ठरलं....साधारणतः १२.०० ला हर्णेला पोचलो.... हर्णे बंदर असल्यानी गेल्या बरोबर लगेच भरपुर बोटी दिसायला लागल्या....

हे राम ! हे शाम !!

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 19/01/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्लम डॉग मिलेनिअर पाहिला.... नेहमीसारखाच मसाला भरलेला आहे.. काही मसाला मात्र मुद्दाम घुसडल्याप्रमाणे वाटतो. १. चित्रपटामध्ये हिन्दु समुदायाने मुस्लीम मुहल्ल्यावर हल्ला केलेला आहे, असे चित्रण आहे..'ये मुस्लीम है , इनको मारो.. ' असा उघड उघड उल्लेख आहे. लोकांच्या हल्ल्याच्या वेळेला प्रभू रामाच्या वेशभूषेत एक छोटा मुलगा दाखवला आहे, त्याची नजर इतकी विखारी आणि दुष्ट दाखवली आहे , की हे सर्व जाणीव पुर्वक केलेले आहे, असे जाणवत रहाते..... हिंदुनी केलेले आक्रमण कथेची गरज म्हणून कदाचित सुसंगत असेलही, पण रामाच्या प्रतिमेचे मात्र उघड उघड विकृतीकरण केलेले आहे... तेही कारण नसताना ... २.

चूक..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 19/01/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
कैफात चूक झाली, डोळे भरून आले. "सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले. टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या, रचला कलंक भाली, डोळे भरून आले. निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले. वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा. मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले. विझला इथे सुडाचा वणवा मनातला पण झाली चिते हवाली, डोळे भरून आले. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras