ही तशी माझीच आहे गोष्ट पण...
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण....' ही ग़झल.
आज मी सारे खरे ते सांगतो
मी अताशा नवकवींना टाळतो
ते गळी पडणार अंती जाणतो
पण तरी मी पूर्ण फिल्डींग लावतो
संकटे साहीन मी अन वादळे
नवकवी पण धैर्य माझे भेदतो
तो पहा मी चाललो वाटेवरी
शत्रू माझा वाट माझी रोखतो
ऐकताना काव्य त्याचे का मला
काळ पुढती जाईनासा वाटतो
जांभया देऊनही मी एवढ्या
काव्य साला तेच आहे वाचतो
सूड म्हणुनि गोष्ट माझी ही कधी
मुक्तछंदी मी कुणाला सांगतो
टाळती का लोक पण मज ना कळे
कालचा मी नवकवी ना आज तो
- भटोबा
मिसळपाव
मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार!
त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!
(हृदयनाथप्रेमी) तात्या.