Skip to main content

प्रजासत्ताक दिन आणि सन्मान

लेखक तात्यालबाड यांनी सोमवार, 26/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण, अशोकचक्र आणि यांसारखे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्या शहिदांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात आले. पण शशांक शिंदे यांना मात्र यातून वगळण्यात का आले ? दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले. या दोघांनी पद्मविभूषण मिळावे असे काय भरीव सामाजिक कार्य केले आहे ? निदान माझ्या तरी वाचनात नाही.

कॉकटेल - सोमरस संबधी... !

लेखक दशानन यांनी सोमवार, 26/01/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
कॉकटेल - दोन अथवा अनेक प्रकारच्या वाईन / दारु मिक्स करुन जे दिले जाते ते म्हणजे कॉकटेल असा माझा समज आहे, येण-या शनिवारी काही मित्र कॉकटेल पार्टी करु म्हणत आहेत.. पण सगळेच माझ्या सारखे आडाणी... ग्लासात घालणे व ढोसणे ह्याच्या पुढे - मागे काहीच माहीत नसलेली... महाजालावर शोध घेतला पण इंग्लिश कच्चे असल्यामुळे योग्य माहिती सापडली नाही आता पर्यंत तरी.. तोच डोक्यात विचार आला मिपा वर अनेक तळीराम आहेत ते मदत करु शकतील. मला व्हिस्की व रम प्रकारातील कॉकटेलची माहीती हवी आहे... इतर ही दिल्या तरि चालतील कोणाला णा कोणाला तरी उपयोगी पडतीलच.

पोहे-बटाटा प्यटिस

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
२ वाट्या पातळ पोहे २ मोठे बटाटे उकडून किसलेले ४/५ मोठे चमचे आल-लसून ,मिरची-कोथींबीर पेस्ट पाव छोटा चमचा हळद मीठ चविनुसार तळण्यासाठी तेल. १ . पोहे धुवून घ्यावेत व १/२ ते १ तास तसेच ठेवावेत. २. चांगले मऊ झाल्यावर त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळावे. ३. मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गो़ळे करुन मध्यम आचेवर तेलात तळुन घ्या. ४. टोमॅटो केच अप अथवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खायला द्या. ( मिश्रण एकजीव करताना पाणी अजीबात वापरु नये अन्यथा प्यटिस तेलकट होइल)

चारोळ्या

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी कविता वाचून जीवन जगायची रित कळली दु:खावर मात करायची आता मला सवय लागली. नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव.

चारोळ्या

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
सोनपिवळ्या सकाळी सारेच मिळवितात हात घनघोर अन्धारात मात्र सावलिहि सोडते साथ. सागराला भरती येते ना चन्द्राला पाहून तसच होत मला तूझ्या विचारात असताना तूला पाहुन

tomato सूप

लेखक मानसी मनोजजोशी यांनी सोमवार, 26/01/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी मला माहित असलेली पद्धत इथे लिहित आहे . या पद्धतीनेहि सूप छान होते.try करुन बघावे. १. ४/५ tomato चिरुन कुकरला वाफवावेत. २. गार झाल्यावर मिक्सरला लावुन पेस्ट करावी. ३. पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेली पेस्ट मन्द Gas वर ठेवून चमच्याने मधुन मधुन हलवत रहावे . ४. उकळत असताना त्यात २/३ चमचे साखर , चविनुसार salt, चिमूट्भर लाल तिखट घालवे. ५. १ चमचा cornflour घेउन त्याची पेस्ट बनवून त्यात घालावी व एकजीव करावे. ६. दाट झाल्यावर Gas बन्द करावा. ७.serve करताना फ्रेश क्रिम व तळलेले ब्रेडचे तुकडेघालुन serve करावे . {tomato बरोबर थोडे गाजर व बीट घालूनही हे सूप छान लगते.} »

तेथे कर माझे जुळती !

लेखक यांनी सोमवार, 26/01/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची. पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

मिपाची वाटचाल आणि इतिहास

लेखक विंजिनेर यांनी सोमवार, 26/01/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक/प्रशासक मंडळींना रामराम, मिपाचा जन्म कसा झाला हे काही चर्चांमधुन क्वचित जाणवते(जेव्हा विसोबा नाहितर तात्या काही किस्से सांगतात तेव्हा) पण हा सगळा प्रवास कसा झाला आणि ह्या संकेतस्थळाचा चालविता(ते) धनी कोण, त्यांचा परिचय हे सगळे "मिपाचा प्रवास/मिपाची चित्तरकथा" (Category:About Us) अश्या सदराखाली प्रकाशित करायला काय हरकत आहे? मी मिपाचा सदस्य झाल्यापासून बराच शोध घेतला पण काही सापडले नाही म्हणून विचारत आहे.