Skip to main content

महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 19/02/2009 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिव जयन्ती निमित्त - बहुत यवन पीडिती स्वधर्माते, महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | मांडुनी मोडिली क्षेत्रे..... विरश्रिये संचविली, गलितही गात्रे | उभविले स्वराज्य भगव्द्ध्वजाते, महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | शिवबा दे अम्हा झगडण्यास स्फूर्ती, उखडूच ते हात जे फोडिती मूर्ती | धर्मरण स्थंडील अता हे धगधगते , महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !! ---- सागर लहरी
Taxonomy upgrade extras

लघूकथा लेखन आव्हान

लेखक विकास यांनी गुरुवार, 19/02/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आत्ता चाललेल्या एकंदरीत चर्चा पहाता हा एक नवीन धागा विरंगुळा म्हणून चालू करावासा वाटला :-) शिर्षका प्रमाणे लघुकथालेखनाचे आव्हान आहे, स्पर्धा नाही. म्हणजे थोडक्यात "लिहूनच दाखवा" असे म्हणले असले तरी स्पर्धा नसल्याने व्हर्च्युअल बक्षिस पण नाही ह्याची खात्री बाळगा. तर आव्हान असे: पाच वाक्यांचे लघुकथा लेखन करा आणि सहावे वाक्य हे खालील पैकी एक असावे:
हेच मला भारतातील आवडत नाही अथवा म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.
बाकी पाच वाक्यात शब्द मर्यादा नाही....

म्यां नवल पाहिले---पुलाउ ओरांग उतान

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 19/02/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियादेशावर निसर्गाचा वरदहस्त असल्यामुळे निसर्गातील अनेक चमत्कार येथे बघायला मिळतात परंतु मानव आणि वन्यजीव यांची सांगड घालणारे एक नवलही मला येथे ''पुलाउ ओरांग उतान'' येथे पहायला मिळले. पुलाउ म्हणजे बेट या बेटावर ओरांग उतान ह्या मानवसदृश वानरांचे संवर्धन , पुनर्वसन, संशोधन , निगराणी इ. कार्य केले जाते. सिंगापूर ते थायलंड ह्या महामार्गावर कोलालंपूरपासून साधारण २ ते २.३० तासांवर 'बुकिट मेराह' नावाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथून 'मरिना'या गावापासून जेटीने बेटावर पोहोचता येते.

जिन्हे नाझ है मराठीपे वो कहा है ?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 19/02/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला. उल्हासनगरच्या एका कॉलेजने मराठी विषय बंद करायचे ठरवले. विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा सात्वीक संतापाने नवशक्तीच्या कचेरीत गेला .बिडवईंना (मला वाटतं ते तेव्हा सहसंपादक होते.) भेटला. दुसर्‍या दिवशी ती बातमी नवशक्तीच्या पहील्या पानावर. त्याच दिवशी विधान सभेत लक्षवेधी सूचने द्वारा या गोष्टीची दखल घेण्यात आली. कॉलेजच्या व्यवस्थापनाने सपशेल माफी मागून मराठी बंद होणार नाही याची ग्वाही दिली. (अभिमानाची गोष्ट अशी की तो विद्यार्थी मिपा सदस्य आहे.) -------------------------------------------------------------------------------------------- आता व

मी गेल्यावर वि़झुनी जातील--

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 19/02/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार
Taxonomy upgrade extras

आभाळमाया - असं असतं का प्रेम?

लेखक मराठी यौधा यांनी गुरुवार, 19/02/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळमाया - असं असतं का प्रेम? एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. ""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?'' ""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.'' ""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?'' ""हो!

भारतीय इमोश्नल ब्लॅकमेलिंग व चुकीचे आदर्श

लेखक त्रास यांनी गुरुवार, 19/02/2009 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक बातमी- अमके तमके श्री. प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्यांना तमक्या वकिलातीने व्हीसा नाकारला. [बातमीत हे देत नाही की त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली होती की नाही. पण आमच्या लाडक्या दैवताला तुम्ही व्हिसा देत नाही हा "इमोशनल" मुद्दा लावून धरला जातो व लोकांच्या समोर चुकीचा आदर्श उभा राहतो. व्यक्तिमत्व लाडके असले म्हणजे काय झाले त्यांना कायद्याच्या सवलती नसाव्यात हा मुद्दा त्यात येत नाही.] दुसरी बातमी- श्री. अमुक तमुक ह्यांनी १००० नाटकाचे प्रयोग केल्यानिमित्ताने सत्कार [त्यांचा नाटक हा व्यवसाय आहे. मग त्यात काय विषेश- सत्कार कशाबद्दल? त्यांनी अभिनय हा व्यवसाय पोटापाण्यासाठी निवडला आहे.

(मनोक्रमी मिपाकर)

लेखक कवटी यांनी गुरुवार, 19/02/2009 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर राहुन, जळाऊगिरी करीत आणि फक्त मिपावर येणार्‍या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, मिपाच्या मोठ्या भावंडांची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या मिपाकर लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या मिपाकर असलेल्या, पण लेखात प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह धरणार्‍या लोकांची ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मिपाकर माणसाला खरंच गरज आहे कां? इथल्या ज्या कायम निवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित लेखक म्हणून दिवाळी अंकात लेख लिहायला बोलवतात.