माणूस आहे! शेवटी चुका करणारच...पण कधीकधी काही चुकांनंतर स्वतःवरच फार चिडचिड होते. हा धागा अशाच चुकून बघितलेल्या चित्रपटांविषयी....
अशा वेळेस खर तर फक्त त्या चित्रपटाची चिरफाड समीक्षा लिहावी इतका उत्साह नसतो किंवा तितकी त्या चित्रपटाची लायकीही नसते, पण तरीही 'भडास' कुठेतरी काढावशी वातते, हा धागा खास त्याच्यासाठी!!
तर सुरुवात माझ्यापासून - मी Delhi-6 पाहिला (सांगितल ना, चुकलं माझं!), लागला त्याच्या दुसर्याच दिवशी. तेव्हा परीक्षण वगैरे काही वाचले नव्हते, पण प्रमोज ठीक वाटले, आणि राकेश ओमप्रकाश मेहरा (पुढच्या वेळेस रा. ओ. मे. हं!) म्हनजे अक्स, रंग दे बसंती वाला.