Skip to main content

*वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...*

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
*#आषाढी #भक्ती #वारी #आपलीच* *#माती #आपलीच #माणसं* *#विठ्ठल #मायबाप #माऊली #पावसाळा #देव* पावसाळा म्हणले की खूप काही असतं ...नुसता प्रेम आणि सौंदर्याचा मोसम नाही तर ह्याच पावसाळ्यात भक्ती रसाच अत्युच्च उदाहरण दाखवणारी पंढरपूर ला जाणारी वारी होय!... यंदा महामारी मुळे वारी निर्बंध असल्याने हा योग हवा तितका पाहायला तसेच अनुभवायला मिळणार नाही...पण त्यात काहीच मन उदास करून घेण्यासारखे नाही .... वारी म्हणजे फक्त पंढरपूरला चालत जाणे एवढेच असते का?? त्याचा जीवनातला अर्थ काय ??? याच साऱ्या प्रश्नांमधून एक लघु कथा... *वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...* "व्हाय डींट यू चेक अवर कार व्हेन वी वेअर

पॅकेज असतं रे

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/06/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
“समोशात साखर टाकली का रे?” पहिला घास घेताच निखिल ओरडला. “नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.” “पण समोशाची चव बिघडते ना.” अपरिपक्व बटाट्यामुळे त्याचा मूड गेला तशीही त्याला Too much Too early ची खूप चीड होती. समोशाची प्लेट तशीच ठेऊन तो अक्कलकोटकडे निघाला. तो अधूनमधून देवस्थानाला भेट देत असतो. देवाच्या पाया पडणे तर होतेच पण त्याचा विश्वास होता अशा ठिकाणी नवीन आवाज सापडतो, असा आवाज ज्यावर शहरातल्या सुगम संगीत विद्यालयाचे संस्कार नाही. गाताना उगाच ताना नाही की गरज नसताना उंचावलेला सूर नाही.

बाल वयातील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी गुरुवार, 17/06/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
छोठ होत वय माझ, ‌ पण खोट नवत प्रेम प्रिये . माध्यमिकच्या त्या बाल वयातील तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये . तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये. तुज पाहता शाळेच्या आदोगर, हृदयाचा पडायचा टोल प्रिये. तुझ्या येण्याने Classroom म्हणजे, जणू बहरलेला मोगराच प्रिये तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये. तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये. हे सर्व घडायचे माझ्या मनी पण, तुज कोठे होते ठाऊक प्रिये. ✍️#Shubham_1way
काव्यरस

हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 16/06/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे. त्याला कारण ही मजबूत आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.

आधार घेते

लेखक सरीवर सरी यांनी बुधवार, 16/06/2021 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
रेंगाळलेली सांज होतांना नभीधुंद जरा माघार घेते, चांदण्याची रात होतांना तुझ्या मिठीचा आधार घेते||१|| दवांत भिजलेला गुलाब पहाटे खुडण्याचा अपराध करते, नको थांबवू तुझ्यासाठी काट्याचाही घाव एकवार घेते||२|| नाजूक वात तेवतांना देवाला कधी प्रश्न विचारते? उमलू दे तुझे नेत्रदीपक उरला जरी मी अंधार घेते||३|| बांधून रहस्य गाठोडे पाऊलवाट प्रवासाला निघते, विसावशील मन गाभारी तुझा अनमोल व्यापार घेते||४||