Skip to main content

खडकफूल

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/07/2021 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो. तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही... संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/07/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

२१५

लेखक सारिका होगाडे यांनी गुरुवार, 01/07/2021 06:14 या दिवशी प्रकाशित केले.

२१५

(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.) आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते. आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो.

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 30/06/2021 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

शिल्पकार !

लेखक राघव यांनी बुधवार, 30/06/2021 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा.. कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला.. दर्‍याखोर्‍यातून कितीदा, देह घरंगळलेला.. किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला.. कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं.. कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं.. इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात.. अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात.. छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई! -- दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला? खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला! राघव [२०२१]
काव्यरस

चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 30/06/2021 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.

मी लसं घेतली... मी लसं घेतली...

लेखक अभिषेक९ यांनी मंगळवार, 29/06/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
(मी कात टाकली च्या चालीवर, श्री ना धो महानोरांची माफ़ी मागुन) मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... करोना काळात, करोना काळात चावंळ चावंळ चालती भर लॉकडाउनात, तोंड लपवत चालती करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... ह्या कोविड-वरती, मी शील्ड पांघरती मी अनलॉक मोरनी बाई, चांदन्यात न्हाती मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली...

कावळा आणि लॉक डाऊन

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 29/06/2021 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
दाटून आलेलं आभाळ पण पाऊस पडत नव्हता उडू की नको या विवंचनेत पडलेला एक अर्धा भिजलेला कावळा कसा बसा, शहारत, तोल सावरत गर्द आकाशाकडे बघत चारी दिशांना काय शोधत होता कुणास ठावूक नक्की काय करावं या विवंचनेत त्याचा चेहरा बहुधा अधिकच काळवंडलेला शेजारच्या कावळीच्या जास्त जवळ जावं तर सोशल डिस्टंसिंग आड येणार अंतर पाळावं तर शेजारच्या बिल्डिंग वरचा कॉम्पिटिटर टपूनच बसलेला अंधारे क्षितिज लंघून पलीकडे जावं तर ..पलिकडे नक्की काय आहे, .. मित्र आहेत की शत्रू की इथल्यासारखंच तिथे ..जाताना वीज तर पडणार नाही ना .. भिजलेले पंख किती काळ फडफडू शकणार आपण आणि गेल्या कित्येक दिवसांचा ..
काव्यरस

रे

लेखक साहना यांनी मंगळवार, 29/06/2021 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यजित रे ह्या माणसाबद्दल मला खरोखरच आत्मीयता वाटत आली आहे. जी प्रौढ व्यक्ती लहान मुलांचे मनोरंजन करू शकते किंवा मुलांच्या दृष्टिकोनातून लिहू शकते ती व्यक्ती खरोखरच प्रतिभाशाली आणि हृदयाची चांगली असते असे माझे प्रांजळ मत आहे. ह्यात केल्विन आणि हॉब्स चे बिल वॉटर्सन, अमेरिकन TV मिस्टर रॉजर्स (त्यांचा हि काँग्रेस मधील साक्ष जरूर एका [१]), आलीस इन वोडरलँड चे लेविस ह्या लोकांचा अंतर्भाव ह्यांत होतो. साने गुरुजी ह्यांचे लिखाण मला आवडले नसले तरी माणूस म्हणून ते निःसंशय खूप चांगले होते असे वाटते. सत्यजित रे ह्यांचे नाव ह्यांत खूप वरचे आहे.

भारतीय टायटॅनिक - एस. एस. रामदास

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 27/06/2021 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
१७ जुलै १९४७ या दिवशी एस. एस. रामदास ही बोट रेवसजवळच्या काशाच्या खडकाजवळ उलटली. या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हढी माहिती नाही. त्याबद्दल थोडंसं - एस. एस. रामदास ही बोट सिंदीया स्टीमशिप कंपनीच्या मालकीची होती. ही कंपनी मुंबई पासून गोव्यापर्यंत कोकणाच्या वेगवेगळ्या बंदरांपर्यंत प्रवासी वाहतूक करत असे. दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश - भारतीय नौदलाकडून घेतलेल्या ८ - १० अजस्त्र बोटी या सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या मालकीच्या होत्या. यापैकीच एक म्हणजे एस. एस. रामदास. १९३६ साली बांधलेली ४०६ टन वजनाची ही बोट तीन मजली - तीन डेक असलेली - होती.

वेड लागले

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 26/06/2021 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
वेड लागले सखया, जिवाला वेड लागले. दिसलास तू , सांगू कशी , माझी न मी राहिले. वेड लागले सखया , जिवाला वेड लागले. जादू अशी झाली कशी , दो नयनांच्या भेटीने. आनंद हा साठवू कसा , इवल्या या मुठीने फूलपाखरू हो ,मन माझे , तुला धुंडताना आभाळ हे वाटे थिटे , तूज सवे हिंडताना स्वप्नात मी रमले अशी , हे चित्र रेखताना प्रीत ही तुझी माझी , पाहते बहरताना स्वप्नांना पंख मिळाले , घेता हात हाती दुनिया नवी वसवेन मी , तू असता सोबती वेड लागले सखये, जिवाला वेड लागले दिसलीस तू सांगू कसा , माझा न मी राहिलो वेड लागले सखये जिवाला , वेड लागले.
काव्यरस