Skip to main content

पाहायचं आहे

लेखक जागु यांनी सोमवार, 01/06/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
पाहायचं आहे हळूच तुला माझी वाट पाहताना डोळ्यांची माझ्या वाटेवर अधीर नजर रेंगाळताना पहायचं आहे हळूच तुला माझ्या आठवणीत रमताना आठवण काढत काढत तु गालात लाजताना पहायचं आहे हळूच तुला माझ्यासाठी अश्रू ढाळताना काळजातले अश्रू ढाळत वाहणारे प्रेम पाहताना पहायचं आहे हळूच तुला मी स्वप्नात येताना स्वप्न पाहत पाहत गोड भाव फुलताना.
Taxonomy upgrade extras

विरह

लेखक अरुण वडुलेकर यांनी सोमवार, 01/06/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या हिरव्या वनांत या जरि पानोपानी छाया ग, दृष्टि समोरी तूंच नाहि तर हिरवळ डोळां जाळी ग | सहा रसांचे स्वाद लेऊनी अमृत जरि मम पात्रीं ग, घांस द्यावया तूंच नाहि तर ठसका कंठी रुतला ग | फुलापरी ही कोमल शय्या जरी निरव या रात्री ग, स्पर्शावाचुनि मोरपिशी तव उरांत भडका उठला ग |
Taxonomy upgrade extras

लाल भोपळ्याची तुपावरची भाजी.

लेखक जागु यांनी सोमवार, 01/06/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पाव किलो लाल भोपळयाचे छोटे तुकडे किसलेल ओल खोबर पाव वाटी चविपुरते मिठ फोडणी : तुप २ चमचे, जिर, २ मिरच्यांचे तुकडे प्रथम वरील फोडणी द्यायची व भोपळ्याचे तुकडे घालायचे. वाफेवर शिजवत ठेवायचे. अर्धवट शिजल्यावर मिठ टाकायचे. जास्त शिजवू नयेत शिजले की वरून खोबर टाकायच. ह्या भाजीत हळद हिंग घालत नाहीत त्यामुळे ही उपवासालाही चालते व भोपळ्याचा आणि तुपाचा छान वास येतो.

पालकचे रायते

लेखक जागु यांनी सोमवार, 01/06/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ जुडी पालक निवडून, स्वच्छ धुवून १ मिरची १ अर्धा वाटी दही चविपुरते मिठ, साखर फोडणीसाठी : २ चमचे तुप, जिर, कढीपत्ता. प्रथम पालक, मिरची थोड्याश्या पाण्यात शिजवावे. शिजल्यावर स्मॅश करून त्यात दही, मिठ, साखर घालायची व त्यावर वरील फोडणी घालायची. झटपट व चविष्ट रायते तयार. टिप : फोटो काढलेला नाही त्यामूळे इथे देता आला नाही.

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 01/06/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे.

वर्णन (तमाशातले सवाल जबाब): पुन्हा लेखन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णन (पुन्हा लेखन) (जुने वर्णन येथे आहे) (चालः तमाशातले सवाल जबाब) (सवाल जबाबात प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतो. प्रस्तुत सवाल जबाबात तो आणि ती एकमेकांची स्तुती करतात.) तो: अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss कोरस: आली नटून थटून ही बया, हो पाव्हन, लावती लळा तुम्हा पुन्हा पुन्हा घेवुन जा घरला एकदाची, नायतर ज्वानी जायची वाया...
Taxonomy upgrade extras

"आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 01/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो.

झाले गेले विसरुनी जाऊन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/06/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
झाले गेले विसरुनी जाऊन झाले गेले विसरुनी जाऊन, सांग तू माफ करशील का? करशील का? || ध्रु || न जुळू शकल्या आपूल्या तारा न फुलू शकला मनमोर पिसारा माणूस म्हणूनी ओळखशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || १ || उलटे सुलटे पडले फासे दान दैवाचे हातात न गवसे रिते हात पकडशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || २ || न लागली मेंदी हाती न लागले कुंकू माथी अखेरचे तू बघशील का? सांग तू माफ करशील का? करशील का? || ३ || - पाषाणभेद
Taxonomy upgrade extras