क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.
मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो.
कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता.
कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे.
या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले.
यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.
मिसळपाव