राम राम मायबाप मिपाकरहो,
मिपाच्या संपादक मंडळात काही बदल करण्यात आलेले आहेत. प्रियाली आणि मृदुला यांना हल्ली कामाच्या व्यग्रतेमुळे संपादक पदाला पुरेसा न्याय देता येत नाही. प्रियाली यांनी यापूर्वीच तसे सांगितले होते.
असो..
आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मिपाचे एक सन्माननीय सदस्य, हितचिंतक आणि आमचे मित्र बिपिन कार्यकर्ते यांना मिपाचे संपादक पद बहाल करण्यात आलेले आहे. मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे.
आज दिनांक १ जुलै रोजीचे संपादक मंडळ खालीलप्रमाणे.