फणसाचे सांदण
जून जुलै महिन्यात घरी फणस पिकून दरवळू लागतात.बाहेरुन काटेरी पण आतून गोड, बरका गरा असा बचक्यात मावत नाही. तो अलगद ओठाशी धरायचा आणि आत ओढून घ्यायचा. शेजारीच ठेवलेल्या खोबरेल तेलाच्या वाटीत हाताला लागलेला चीक पुसत पुसत , एका मागोमाग एक किती गरे फस्त झाले त्याचा हिशेबच उरत नाही. गरे खाउन मंडळी कंटाळली की घरी सांदणांचा घाट घातला जातोच.
तांदूळ भिजवून कोरडे केले जातात. जात्यावर त्याच्या कण्या निघतात. बरक्या गर्यांचा रस काढण्यासाठी बाल गोपाळ चाळण्या घेउन बसतात. बाहेर पावसाच्या सरी कोसळताना गरमागरम सांदणे खाण्याची मजा औरच !!
कोकणात केली जाणारी ही पाककृती.तशी अनवट.
मिसळपाव
इथे वाढला वसंत,
दंवे ओलावली माती सुखकर
थांब ऐकु दे समीरा
गीत हिरवाईचे निवांत क्षणभर
थांब जरा बोल हळु
ऐक डुलत्या पालवीचे शब्दसुर
बघ नि:शब्द रानवेली
अलवार करीती नाजुक कुरकुर
ओज कसे वृक्षगर्भी
ओल्या पानांची किंचीत थरथर
झाडांमधुनी नागमोडी
वाट जशी कुणी नार अटकर
हे रान हिरवे लाजले
कोवळी जणु नववधु नवथर
इथे ओलावला वसंत
पालवी गाते हिरवाई निरंतर
सभोवार सौंदर्य फाकले
क्षणात मिटले स्वर्गाचे अंतर
विशाल