मटाची सांगितिक दिवाळखोरी...
आजच्या मटामध्ये स्वर्गीय भास्कर चांदावरकर यांच्याविषयी अग्रलेख आहे. मात्र त्यात त्यांच्या काही गाण्यांचा उल्लेख करतांना मटा संपादकांनी भावनेच्या भरात एक घोडचूक केली आहे..
सुरेश भट साहेबांचं 'उष:काल होता होता..' हे गाणं भास्कर चंदावरकरांचं आहे असा त्यात उल्लेख आहे. वास्तविक हे गाणं चंदावरकरांचं नसून पं हृदयनाथ मंगेशकरांचं आहे.
विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं!
मटाचा जाहीर निषेध..
आपला,
(हृदयनाथप्रेमी) तात्या.
मिसळपाव