Skip to main content

गाणी - मनातली

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 10/08/2021 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जीवनातल्या प्रत्येक घडीसाठी, प्रसंगासाठी, घटनेसाठी गाणी पुरवलेली आहेत. तुम्ही कोणताही प्रसंग डोळ्यासमोर आणा, त्याला साजेसं गाणं तुम्हाला नक्कीच सापडेल. प्रियकराला स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हिंदी गाणी जितक्या आस्थेने मदत करतात तितक्याच आस्थेने प्रेमभंग झालेल्या हृदयाला पिळवटून टाकणारी गाणी तत्परतेने पुढे येतात.

इंग्रजी माय माफ कर

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 10/08/2021 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझे दहावीपर्यंतेच शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले, म्हणजे अगदी विज्ञान सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करण्यापेक्षा Newton’s law of motion पाठ करणे सोपे आहे हे अकरावाव्या वर्गात समजले. बऱ्याचदा असे वाटते स्वादुपिंड, यकृत, आतडे, जठर यात अडकून जर गोंधळ झाला नसता तर मी आज इंजीनियर होण्याऐवजी डॉक्टर झालो असतो. आता जरतरला काही अर्थ नाही. माझा इंग्रजी माध्यमाचा पहिला तास आजही आठवतो. अकरावीचा गणिताचा तास होता. सर Logarithm शिकवत होते. सरांनी फळ्यावर an असे लिहिले आणि याची फोड करुन सांगा असे विचारले.

ग्रीष्मोत्सव साजरा!

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 10/08/2021 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सव नंतर ... वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो.

गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 10/08/2021 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपळाने सोडले गावाच्या पाऱ्याला. फ्लैट मध्ये आला मनी प्लांट झाला. (२) वाळूचे मनोरे वार्यात उडाले. भग्न स्वप्नाची अधुरी कहाणी. (३) कल्पनेला मिळेना साथ शब्दांची. कोरीच राहिली वही कवितेची. (४) पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काटा रुते कुणाला हा दैव योग आहे. भाला रुते कितींना हा मोदी योग आहे.