आणि पाय माझा घसरतो !
आजकाल कुठेही, कसाही...; पण पाय माझा घसरतो...........
सोकावलेला सहकारी नेहमी सांगतो
अंडर द टेबल व्यवहार करायला शिक
आदर्श, नितीमत्ता आणि सोकॉल्ड संस्कार
अलगद वेशीवर टांगायला शिक
मी कसाबसा स्वत: ला तयार करतो
संस्कारांना मनाच्या अंधार्या कोपर्यात कोंबतो
नेमकं तेव्हाच माझाच आरशातला चेहरा ...
माझ्याकडे पाहून खुदकन हसतो .....
.........................आणि पाय माझा घसरतो !
चालता चालता मी हजारवेळा थबकतो
रस्त्यावरची चालती-बोलती सौंदर्यस्थळे पाहून
नकळत जिव माझा कसानुसा होतो
त्यांच्याकडे पाहत मी स्वतःलाच समजावतो
परस्त्री मातेसमान हे आता विसरायला हवं
असं म्हणत स्वतःलाच फसवायला बघतो
नजरा चुकवत मान वळवून
मिसळपाव
हे व्यंगचित्र लई भारी आहे! रिपब्लिकन पक्षाच्या "टीकेसाठी टीका" नीतीवर मारलेला हा टोमणा आहे.
सुधीर