Skip to main content

युनिकोडी मोडीचा मसुदा व आवाहन

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 15/02/2010 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुघड सुबक अक्षरवळणे जपणार्‍या मोडी लिपीस युनिकोड मध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. मिशिगन विद्यापीठातील डॉ. अशोक पाण्डेय यावर काम करत आहेत. प्राथमिक मसुदा आपणास येथे सापडू शकेल. मोडी चे युनिकोडीकरण निर्दोष व्हावे याकरिता मोडी प्रेमी व तज्ज्ञांकडून सूचना/ टीपण्ण्या अपेक्षित आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/02/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या

मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 14/02/2010 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आत्ताच परततोय गेट वे ऑफ इंडियाहून. आज व्हॅलेन्टाईन डे ना? तसंही काही काम नव्हतं. धंदा आजकाल थोडा डाऊन आहे. नुसतं घरी बसून काय करणार? त्यातून रैवार. मग मी देखील गेलो होतो फिरायला माझ्या एका मैत्रीणीसोबत. .व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला! गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी तीही आली होती मला भेटायला. त्यातून तिचा आज वाढदिवस. मी तिच्याकरता मेट्रोच्या क्यानीकडचे छानसे मावा नेले होते. आम्ही दोघं गेटवेला एक छानशी जागा पकडून बसलो. सुंदर हवा, गेटवेवरचा आल्हाददायक वारा. मी तिला हॅपी बर्थडे म्हटलं. तिनं तिचं ते नेहमीचं जीवघेणं स्मितहास्य केलं! तिथेच आसपास एक फिरता भेळवाला घुटमळत होता.

प्रवास

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी रविवार, 14/02/2010 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो. जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं.

हिमेजी

लेखक नंदू यांनी रविवार, 14/02/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले. हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता. सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे.

गुलाबाचा सण होता

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 14/02/2010 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
काव्यरस

प्रेमदिन

लेखक जयवी यांनी रविवार, 14/02/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिन आला म्हणून करतात प्रेम प्रेमदिन सरला की पळतं प्रेम प्रेमदिन सरला की ओसरतं प्रेम प्रेमदिन सरला की विसरतं प्रेम कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत प्रेम करा, प्रेम करा.... म्हणून होतं का प्रेम प्रेमदिन आला म्हणून करता येतं का प्रेम सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ जयश्री

व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेम दिवस

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 14/02/2010 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध..... उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो. निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे..... अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो.