विक्रमादित्याचा पोवाडा
कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS
कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला.... हो ओ SSSSSSSS
पण महाराजा... शेर आखीर शेर होता है......
त्यानं सोडला नाही ठाव..SSS,
सोसले..., गुमा SSS न सारे घाव SSS....
लावला नेम, पकडली येळ .....
अन डाव कीं हो साधला ..... जी ई ई SSSSSSS
सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न ...
राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS
रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे....
पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला....
शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे....
राजाच्या सैन्यात हाहाकार...
काव्यरस
दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चानल्स आणि आपला सचिन भाग- १..........
सचिन तेंडूलकर म्हटलं तर त्याचा भोवती एक वलय आपसूकच निर्माण होत. त्याचा विषयी सांगावं तर एक लाजाळू, अंतर्मुख,साधा माणूस आहे. पण त्याचा संयम त्याची एकाग्रता अद्वितीय आहे . एक असा खेळाडू आहे कि क्रिकेट खेळावं तर ह्याने आणि पहाव ते उरलेल्या जगातल्या बाकी सर्व लोकाने
आपला सचिन आहेच मुळी तसा पण एक गोष्ट आहे जी इकडे सांगावीशी वाटते ती म्हणजे हिंदी {दिल्ली } पत्रकारिता अर्थात दुरसंच पत्रकारिता (मिडिया)
काल-परवा पर्यंत सेहवाग सेहवाग करणाऱ्या दिल्लीकरांच्या प्रायवेट न्यूज चानल्सने आज एकदम सचिन च्या नावाचा गजर सुरु केला तो संपूर्ण टी आर पी मिळवे पर्यंत.
चल उसात दंगा करू
चल उसात दंगा करू
मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)
हिरो:
पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू
हिरो:
डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?
काव्यरस
नोकिया E63 आणि वायफाय राउटर
नोकीया E63 वायफाय राउटरशी कसा कॉनफिगर करायचा हे कुणाला ठाउक आहे का? माझ्याकडे नेटगिअरचा राउटर आहे.
३ चारोळ्या
माझ्या हृदयाची स्पंदने
तुझा हळुवार श्वास
प्रणयी संगीताचा जणू
एक नवा आभास
******
वाऱ्याचा वेगही कधी
सहज मंदावतो
तुझ्या गंधाने वेडा
तोही छंदावतो
******
कधी तुझा स्पर्शही मला
मोरपिसापरी भासे
आताशा तुझे श्वासही
वाटतात जणू उसासे
काव्यरस
खट्टा - मिठा
णमस्कार्स लोक्स ,
जेन म्याडमनं आज ताकिद देऊन सुटी घ्यायला लावली होती. कालंच अॅप्रायझल मिटींग मधे बॉसनं तासभर डोकं तासलं होतं ! " ट्राय टू टेक मोर रिस्पाँसिबीलिटीस ... (म्हणजे आणखीन राबा रोज) " , " वी आर हॅविंग प्लान्स फॉर यू ( ढिश्क्यांऊऊऊ.. गोळ्या द्यायला सुरूवात " , " फिनिश अप द प्रॉजेक्ट अँड अल्सो लुक इन ऑदर्स प्रॉजेक्ट्स अल्सो ( घरचं झालं थोडं ... आता व्याही धाडतोय घोडं ) ... इत्यादी इत्यादी टिपीकल म्यानेजरियल गोष्टी सांगुन झाल्यावर सुट्टी सोडाच, पण एक्स्ट्रा कामाचा काँप ऑफ घेणं ही अवघडल्यासारखं वाटू लागतं ! पण आमच्या हायकमांड कडून आदेश आल्यावर काही उपयोग आहे का ?
अजीब दासताँ है ये - तिला आठवताना
...आज अचानक संध्याकाळी का कोणास ठाऊक. पत्नी छायाचा हसरा गोरापान चेहरा, घारे डोळे, त्यावर गॉगल,बेलबॉटम पँट, बुशकोट टाईप टाँप, हाय सँडल्स, कपाळावर जरा मोठी लाल टिकली. - 'सो व्हॉट' - म्हणायची स्टाईल आठवली.छाया आली आणि गेली. आठवणींची सौगात देऊन. त्याला ३२-३३ वर्षे झाली...
... एक साडेसात नंतरची चंदीगढजवळच्या पिंजोर गार्डनजवळ रविवारची संध्याकाळ. रस्त्यावरच्या वाहनांचे दिवे डोळ्यांना दिपवत होते. तेंव्हा धक्का बसल्याचे जाणवले व मी लुडकून स्कूटर अंगावर घेऊन धडपडलो. छाया कोसळली. रस्त्याच्या मध्यावर जाऊन आडवी झाली. म्हशींचा तांडा जात होता.
मिसळपाव