स्वारी गोरखगडावर
"अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा.
मिसळपाव