सांज फुले
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
काव्यरस
'मी'पणाच्या वर्तुळाभोवती
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.
बोली टिकल्या तर टिकेल मराठी
- डॉ. सुधीर रा. देवरे
बोलीभाषा जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं?
अलक (अति लघु कथा)
अलक 1
त्यांच्या शाळेची ट्रिप कोकणात समुद्र किनारी जाऊन आली होती. सगळ्या जणी एकदम खुश होत्या. समुद्र कसा वाटला त्याच वर्णन त्या बाईंना सांगत होत्या. समुद्रावरून वाहणारा तो खारटसर वारा, त्याचा चिकट असा स्पर्श, पायाखालची मऊ मऊ वाळू, पावलांना हळुवारपणे पाण्याने भिजवणार्या लाटा सगळं मोहवून टाकणारं होतं. अगदी पाण्याला हात लावून, त्याची चव घेऊन त्यांनी समुद्र अनुभवला. एकामागून एक येणाऱ्या लाटा संपतच नव्हत्या. नुसतीच पावलं भिजली होती, अजून थोडी पुढे जायची इच्छा होती पण मॅडम ची परवानगी नव्हती. त्या सगळ्या जणी उत्साहाने समुद्राचं वर्णन करत होत्या.
डोळ्यांनी फळे खावित का?
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे:
ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.
ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ?
मिसळपाव