Skip to main content

आसतेस.... नसतेस....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 23/10/2021 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
आसतेस घरी तू जेव्हा कोंड्याचे होती मांडे कळत नाही कसे ते भरती दुधा दह्यांचे हांडे नसतेस घरी तू जेव्हा वाहती दुधाचे पाट अवतार घराचा होतो जसा आठवडी बाजार हाट आसतेस घरी तू जेव्हा कधी रणभूमी सम घर वाटे दामिनी कडाडे वाजे हतप्रभ होती सारी शस्त्रे जेव्हां ब्रह्मास्त्र जलंधारांचे गाजे नसतेस घरी तू जेव्हा अन्न वस्त्रांचे होती वांधे धुणे भांडी करूनी दुखतात किती ते सांधे आसतेस घरी तू जेव्हा चिंता नसे कशाची साम्राज्य आपुले म्हणूनी मिरवतो मीजा़स फुकाची नसतेस घरी तू जेव्हा युद्धभू निशब्द ,नी शातं अभिमन्यू मी चक्रव्यूहातला आत्मबोध होतो मजला खरी अबला आहे कोण येतेस फिरूनी जेव्हां ऩवी नव्हा
काव्यरस

आप मुझे अच्छे लगने लगे.

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 22/10/2021 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आप मुझे अच्छे लगने लगे. इसवी सन २००२. हृतिक= रोहित, अमिषा= सपना, किरण कुमार= ढोलकिया (सिनियर), मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर), निशिगंधा वाड= सपनाची भाभी, आलोकनाथ= रोहितचा बाप. सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन.

अलक (अति लघु कथा)

लेखक मालविका यांनी गुरुवार, 21/10/2021 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णद्वेष/ वर्णभेद अलक 1 ती अगदी आडनावाप्रमाणे कोकणस्थ. दिसायला गोरीपान आणि घारी. परदेशात आल्यावर अगदी त्यांच्यातली नाही वाटली तरी इतर देशी लोकांच्यात उठुनच दिसायची. तिचा लेकपण तिच्यावर गेलेला. घारा नि गोरा. हळूहळू शेजारी पाजारी ओळख वाढल्यावर एका शेजारच्या गोऱ्या म्हातारीने एकदा हटकलच. "तू गोऱ्या माणसाशी लग्न केलं आहेस का?" तिला कळेचना असं का म्हणते ही बाई. मग सावकाशपणे आपण भारतीय आहोत, तिकडून इकडे आलो वगैरे सांगितलं. यावर त्या बाईचा विश्वास बसेना. फक्त युरोपियन लोक गोरी असताना ही बाई नि तीच मूल एवढं गोरे नि घारे कसे असू शकतात असा तिचा प्रश्न हिला बुचकळ्यात टाकून गेला.

रानफुले

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 21/10/2021 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
करू कशाला तमा जगाची मागू कशाला उगा क्षमा प्रमाद माझा एकच झाला शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा ढळलो नाही वळलो नाही वेचत गेलो काटे कुटे शोधत होतो जळ मृगजळी अन गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली तमा न केली उगा कशाची फुटलो मी जरी उरी प्रमाद माझा एकच झाला कधी न केले क्रंदन कितीही शीणलो मी तरी जरी लक्ष माझी सोनफुले शोधत होतो रानी वनी कधी न केले अवडंबर त्याचे जरी हाती आली रानफुले....... 21-10-2021
काव्यरस

कोकोनट अप्पम

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 20/10/2021 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
Appam णमस्कार णमस्कार णमस्कार!!! कसं चाललय मंडळी?? सगळे स्वस्थ आहात ना? चला आता चर्चेत वेळ न दवडता झटपट नारळ अप्पम करा आणि मस्त आस्वाद घ्या. साहित्य: ईडली/साधे तांदूळ - २ कप मेथी दाणा - १ छोटा चमचा पातळ किंवा जाड पोहे - १ कप खोवलेला ओला नारळ - १ कप चवीनुसार मीठ/साखर कॄती: १. तांदूळ स्वच्छ धुवुन ४-५ तास भीजत घालावे २. वाटण्याआधी एक ५ मि. पोहे भीजवुन ठेवावे (खरा एवढाहि वेळ लागत नाहि) ३.

आभाळाच्या फळ्यावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 20/10/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतूच्या खडूने आभाळाच्या फळ्यावर काहीबाही लिहीण्याची होता ऊर्मी अनावर चांदण्यांच्या ठिणग्यांची घेतो मदत जराशी चित्रलिपी सजविण्या लिहीतो मी जी आकाशी रात्र होते जशी दाट तशा काही अनवट मिथ्यकथा नक्षत्रांच्या उजळती नवी वाट झळाळते तेजोमेघ गूढ कृष्णविवरांशी बोलताना, जोडतो मी नाळ आकाशगंगेशी भेट विराटाशी थेट माझ्या नक्षत्रभाषेची रोमरोमातून तिच्या रुणझुण ये सूक्ष्माची लागे उगवतीपाशी जेव्हा उषेची चाहूल माझ्या नक्षत्रभाषेची फिकटते चंद्रभूल

अवघाचि संसार - कल्याण

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 20/10/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते.

वर्षा!

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 19/10/2021 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
१.वसंतोत्सव साजरा २.ग्रीष्मोत्सव साजरा वर्षा...... जीवनासाठी आसुसली धरणी माय श्रावणापासून सरी झेलत झेलत भाद्रपदभर तुडूंब काठोकाठ पाण्याच्या आनंदाने बहरून पावते. शेतातल्या बीजांनी थेंब थेंब रुजून घेऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात विजयाच्या माळा तोंडात सुखाचा घास भरवावा असा हा भारतातला महत्वाचा ऋतू..वर्षा ऋतू! केरळात वर्षा उर्फ मान्सूनचे आगमन झाले की आपल्या घरी हा कधी येतो यासाठी प्राणी,पक्षी,वृक्ष सगळेच चातक झालेले असतात.आभाळ भरून येत ,गरजत आता सर्वत्र थैमान घालण्याच्या तयारीत असतो.त्याला बरसून बरसून स्वच्छ ,निर

हातभार लावावा !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 19/10/2021 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग १ नमस्कार ! एक गमतीदार भाषिक प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे ३० वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे. हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.