दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....
आज एका धाग्यावरील दिलीपकुमारच्या उल्लेखाने , एकेकाळच्या टॉपच्या असलेल्या या अभिनेत्याच्या नाण्याची आजकालची किंमत काय असावी याचा अंदाज आला. या निमित्ताने लोकप्रियतेचे तात्कालिक स्वरूप , व्यक्टींच्या आवडीची व्यक्तीसापेक्षता या सर्वांबद्दल विचार दाटून आले.
इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिलीपकुमार या नटालाही या गोष्टी लागू होणार हे निश्चित होतेच. परंतु , त्याबद्दलच्या मतभिन्नतेच्या संदर्भात इतके टोकाचे ऐकायला मिळावे हे रोचक वाटले.
दिलीपकुमारबद्दलच्या विरोधी शेरेबाजीकरता पवारसाहेबांचा चित्रपटविषयक धागा उघडून पाहता येईल. त्या नटाची योग्यता वर्णन करणारा सन्जोप राव यांचा खालचा परिच्छेद वाचनीय आहे.
मिसळपाव