Skip to main content

उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा" पुस्तक

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 11/05/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो. यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्‍यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो.

डॉक्टरीणबाई

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 11/05/2010 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी चर्चा बरीच जोरात आहे म्हणून आठवली आणि लिहिली. मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो... क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि

ज्वालामुखीचे कवन

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 11/05/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्वालामुखीचे कवन नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल.

अरेरे सांबा ;-(

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 11/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
शोलेमधील लहानशा पण अत्यंत गाजलेल्या सांबाच्या भूमिकेचे सोने करणारा मॅकमोहन ऊर्फ मोहन माखिजा आज देवाघरी गेला. माझी त्याला श्रद्धांजली. शोलेच्या यशात ह्याचाही खारीचा वाटा होता असे मला वाटते. मला असे आठवते की शोले बनत असताना मॅकमोहनने रमेश सिप्पीकडे तक्रार केली होती की मला अगदीच मामूली रोल दिला आहे. रमेश सिप्पीने त्याची समजूत घातली की रोल छोटा असला तरी तुझे नाव प्रसिद्ध होणार ह्याची खात्री बाळग आणि तसेच झाले. "अरे ओ सांबा" हा डायलॉग तमाम चाहत्यांना तोंडपाठ झाला होता.

फतेहपुर-सीक्री सहल..

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/05/2010 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
फतेहपुर-सीक्री सहल..
..
काहींनी 'यात काय मोठेसे?' असे म्हणून नाके मुरडली. ते पाहून चाचाजी म्हणाले , 'मला भरीला घालून उड्या मारायला लावता व परीक्षा पहाता हे मला माहित आहे. असे 'बडबोले' मी रोजच पहातो. मला उड्या मारायला लावून त्यांना वाटते, 'पहा यडा कसा आमच्या तालावर नाचतोय. बरा बनवला!' ... चाचा म्हणाले, 'लक्षात ठेवा, मी उड्या मारणारच होतो. तुम्ही म्हणालात तरी. नाही म्हणाला असतात तरी.

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/05/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला.

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

लेखक जीएस यांनी सोमवार, 10/05/2010 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
चेतन भगतला सिरिअसली घेणारा एक लेख वाचून राहवले नाही, म्हणून मा़झा त्याचे एक पुस्तक वाचण्याचा जुना अनुभव देत आहे... चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त.

खव व व्यनि ची सुविधा देण्यात यावी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 10/05/2010 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय व्यवस्थापक, कृपया मला खव व व्यनि ची सुविधा देण्यात यावी. शक्य असल्यास तशी काही जुन्या सभासदांनी व्यवस्थापनाकडे शिफारस करावी. ------------- (३ महिने मिपावर असूनही या सुविधा नसलेला) वल्ली

दू s s s s र किनारा !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 10/05/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
दू s s s s र किनारा ! असेही दिवस होते बिलोरी. गोड हसायची तू गालांतल्या गालांत, अन गुलाब फुलायचे माझ्या मनात. होऊन प्राजक्त बरसायची तू माझ्या स्पंदनांत अन मीहि आकंठ न्हायचा प्रेमसागरांत ! पण अखेर सागरच तो अथांग ! ! ! भरती, ओहोटी, लाटा, अन असंख्य तरंगांना सहज कवेंत सामावणारा ! सामावत गेलो अथांगांत त्याच्या, ओहोटी, ओहोटीला.

भोवरे...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/05/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
वहीची दुमडलेली पाने... पानापानांतून सोडलेली मोरपीसे... कुठेतरी मधूनच डोकावणारा... शुष्क पण गंधाळलेला मोगरा... आठवणींचे खोल डोह... तळाच्या शेवाळात गुरफटलेली मोहफ़ूले... पुन्हा पुन्हा भिरभिरणारे... आठवणींचे बेभान भोवरे... दुर दुर जाणारी तू... पुन्हा पुन्हा ओढला जाणारा मी ! विशाल