Skip to main content

दू s s s s र किनारा !

दू s s s s र किनारा !

Published on सोमवार, 10/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
दू s s s s र किनारा ! असेही दिवस होते बिलोरी. गोड हसायची तू गालांतल्या गालांत, अन गुलाब फुलायचे माझ्या मनात. होऊन प्राजक्त बरसायची तू माझ्या स्पंदनांत अन मीहि आकंठ न्हायचा प्रेमसागरांत ! पण अखेर सागरच तो अथांग ! ! ! भरती, ओहोटी, लाटा, अन असंख्य तरंगांना सहज कवेंत सामावणारा ! सामावत गेलो अथांगांत त्याच्या, ओहोटी, ओहोटीला. दुरावत गेला तुझा किनारा, नव नव्या लाटांच्या उधाणात. प्रचंड भरतीच्या लाटांनी फेकले पुन्हा किनाऱ्याकडे. खूप दू s s s र सरकलेला किनारा, अन मी एकटा ! एकटा ! ! निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

याद्या 928
प्रतिक्रिया 1

सुंदर आणि करुण!! करुण म्हणून सुंदर!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||