सर्व मान्यवर सदस्य बंधु-भगिनींना एक नम्र निवेदन....!
आज "अक्षय तृतीया..." परंपरेनुसार सोनेदागीने किंवा तत्सम वस्तु खरेदीसाठी, नातेसंबध प्रस्थापित करणेसाठी, अत्यंत शुभ मानला गेलेला मुहूर्त ! थोडक्यात काहीतरी "चांगली" खरेदी करावयाचा हा दिवस असे याचे शास्त्रात वर्णन केले गेले आहे आणि आपण ते प्रमाणभूत मानतो.
या संस्थळावर विविध विषयांवर चर्चा करताना आपण वारंवार पुस्तकांचा संदर्भ देत असतो. तेव्हा मी आपणास विनंती करीत आहे की, आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीच्या लेखकाचे (वा...अन्य कुठल्याही लेखकाचे) किमान एक पुस्तक खरेदी करावे. किंमत दुय्यम आहे. अगदी दहा-वीस रुपयांचा एक कविता संग्रह जरी घेतला तरी चालेल, पण घ्या !!
मिसळपाव