आनंदी 'आनंद' गडे!
७ मे ला टोपालोवने १० वा डाव बरोबरीत सोडवला आणि ५-५ अशी गुणांची बरोबरी झाली. पुढचे दोन डाव बघायला मिळणार नव्हते कारण मी प्रवासात असणार होतो. चुटपुट लागून राहिली की काय होणार ते लगोलग समजू शकणार नव्हते.
अकरावा डाव जिंकण्याची निकराची धडपड आनंद करणार असा कयास होता कारण आनंदसाठी पांढरी मोहोरी असणारा तो शेवटचा डाव होता. झालेही तसेच आनंदने कराराने खेळ केला परंतु एकदोन छोट्या चुकांमुळे टोपालोवने डावाचा समतोल साधला आणि आनंदला पुन्हा बरोबरीच पत्करावी लागली, आता गुणसंख्या होती ५.५ प्रत्येकी!
मिसळपाव