Skip to main content

अफलातून जाहीराती : फ्रेश एपिसोड (२०१०)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 11/07/2010 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
(१) एक मंत्री खुर्चीवर सर्वानुमते जावून बसतात. पण, अनेक वर्षे झाली तरी खाली येण्याचे नाव घेत नाहीत. इतर इच्छुक मनातून नाराज असतात. जनतेला वाटते- "वा! काय सुखी मंत्रिमंडळ आहे ते!" शेवटी इतर मंत्रीगणांचा रागाचा पारा अनावर होतो. "खाली या हो आता" मंत्री खुर्चीसह हवेत तरंगतात व म्हणतात- " खाली न येतो मी, खाली न येतो, खाली न येतो, खाली न येतो मी" मंत्री मंडळातील एक जण- " जारे! खुपीरिया साबण घेवून ये. यांना आंघोळ घाल मग ताळ्यावर येतील ते" खुपीरिया साबणाने आंघोळल्यावर मंत्री खाली येतात.

द गेम ऑफ द सेंचुरी!

लेखक चतुरंग यांनी रविवार, 11/07/2010 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता. लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!

मसाला ऑम्लेट.. केसू स्टाईल

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 10/07/2010 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी >:) प्रोजेक्ट गो लाइव्ह नंतरचा पहिला निवांत शनिवार आज ऑफिसला जायचे नव्हते :P .. त्यामुळे काल सर्व टीम मेंबरांनी अडवे होईपर्यंत 8| सुरा प्राशन करून मुकादमाला (म्हणजे अस्मादिक) मध्यावर बसवून भरपूर तोंडसूख घेतले होते :B ..

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 10/07/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्‍याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात. त्यांची मते माझ्या मतांशी कधी जुळतात तर कधी विरुद्ध असतात. मात्र त्यांनी मांडलेले मुद्दे नेहमीच विचार करण्याजोगे असतात असे मला वाटते.