हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे
प्रस्तावना -
हजारो वर्षे उलटून गेली, हजारो संकटे येऊन गेली आणि असंख्य राजकीय, सामाजिक स्थित्यंतरेदेखील घडून गेली पण आमच्या हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण जे की जातीव्यवस्था ते अजूनही अत्यंत चिवटपणे तग धरुन आहे. प्राप्त परिस्थितीत आमच्या आजच्या भारतीय राष्ट्रास अत्यंत हानिकारक ठरलेल्या आणि हिंदू समाजास न्यूनतः चार सहस्त्र जातींमध्ये विभागणार्या या व्यवस्थेच्या उगमाबद्दल, 'Origins of the caste system' या लेखामध्ये मी थोडासा ऊहापोह केला होता. यासंदर्भात आणखीन काही गोष्टी वाचनात आल्या म्हणून या लेखाचा पसारा मांडत आहे.
मिसळपाव