Skip to main content

..पाउस

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 21/07/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
आलाय पाउस ...चिंब भिजून घे तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे.. थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे पाउस आलाय ... भिजून घे ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे आला आहे पाउस..भिजून घे ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे... आला आहे पाउस...भिजून घे.. ओले कपडे..ओले केस... ओला तळवा.... आणि ओल चिंब मन.. ..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव.. ...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब... ...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे... .......
काव्यरस

नविन कथासंग्रह

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 21/07/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळीनमस्कार, हल्लीमिसळपावचा साहित्य क्षेत्रात उमटलेला ठसा जसा प्राजुच्या कविता संग्रहान रेखीव झाला तसाच आणखी एक ठसा उमटला आहे आपल्या सहप्रवासी अरुण मनोहरांच्या कथा संग्रहाचा!! या बद्दल माहिती मिळाली. अरुण मनोहर हे थोडस लांबुन पाहिलेल व्यक्तिमत्व. एकतर वयान ते जेष्ठ!! आणि सर्व कार्यक्रमात त्यांचा असलेला पुढाकार! सिंगापुरच्या मराठी साहित्यिक क्षेत्रात, अरुण मनोहर हे नाव माहित नसलेली व्यक्ती विरळच!

जुनी

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 21/07/2010 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
ओठातील छळी मला, अधूरी कहाणी जुनी गालातील खळी काढी, खोडी दिवाणी जुनी नीरव डोही काळाच्या, शब्द कुठूनी आले? आठवांच्या लाटा म्हणती मुकी गाणी जुनी सर्वस्व देऊनीही, ऋणमुक्त ना जाहलो विकूनीयाही आत्म्याला, उरली नाणी जुनी बेगड्या दुनियेमध्ये बेगडी किमयाच दिसे शहनाई भासे जरी, आहे पिंगाणी जुनी भग्न वा्स्तूखंडरात धुंडाळशी काय आज? भरभरुनी लुटल्यावरी, उरली विराणी जुनी मनोहर शेर लिखीत, रातराणी गायी गझल का टोचूनी पुन्हा देशी, जखम ही राणी जुनी

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

१२ राशींमधला प्रवास

लेखक शुचि यांनी मंगळवार, 20/07/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते. मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा. वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं.

पाउस आनि निसर्ग

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 20/07/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आणी निसर्ग पाउस हा नसतो फक्त आनंदाचा उरुस तर पाउस हा असतो आभाळाच्या लेकरांनी विश्वाच्या ओसरीत घातलेला धुडगुस पाउस म्हणजे आभाळाने धरणीला दिलेला असतो एक नजराणा आणी पाउस म्हणजे आकाशाचा धरतीला भेट्ण्याचा असतो एक खोटा बहाणा या जलदाच चैतन्य भेटत असत जेव्हा प्रितीत तेव्हा पाउस घेत असतो स्रुजनाला आपल्या गोड मिठीत तहान विसरुन मेघ जेव्हा जलधारा शिंपुन होतात अधु धरणी मात्र होते तेव्हा हिरवा शालु नेसलेली नववधु पावसाच या निसर्गाला काहिच नसत सांगण आणी निसर्गाच या पावसाकडुन काहीच नसत मागण कारण पाउसच असतो या निसर्गाच शुभ्र कोंद्ण आणी निसर्गच असतो या पावसाच हिरवं अंगण .......

सच्चा माणूस!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही. त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ.

प्रकटन

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे.