Skip to main content

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 27/07/2010 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच.

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 27/07/2010 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे जे काही करे ते अंधारात करे उजेडात मात्र इज्जतीले मरे आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ......
काव्यरस

पुण्यात PMT चे वाढते भाडे !

लेखक स्वतन्त्र यांनी मंगळवार, 27/07/2010 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! काल परवाच्या 'सकाळ' मधली मुख्य बातमी वाचली. पुण्यात पंत चे भाडे कमीत कमी ५ रु.तसं पाहायला गेलं तर PMT भारताच्या प्रमुख शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीपेक्षा महागच आहे . आणि जर सुविधांचा विचार केला तर अगदीच शून्य. PMT ची दरवाढ रास्त आहे असा आपल्यास वाटते का ? *पुण्याचे आणि पुण्याबाहेरचे लोकही प्रतिक्रिया देऊ शकतात !

आमची पहिली परदेशवारी..........................

लेखक विलासराव यांनी मंगळवार, 27/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेमबर २००९ मधे... मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी. माफी असावी .....फोटो कसे टाकावे ते कुणीतरी मार्गदर्शन करावे. पेन ड्राईव मधे फोटो आहेत.

चढाई 'पेद्रो दि गावा'ची..

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 27/07/2010 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च २०१० ला जेव्हा मी रिओ ऑफिस मध्ये पाय ठेवला तेव्हा दरवाज्यातून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारे दृश्य पाहून मी दोन मिनिटे स्तब्ध झालो.. एक प्रचंड मोठी दगडी भिंत, एक सुळका आणि घनदाट जंगल.. DSCN0424 DSCN0428

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०३)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 27/07/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://www.misalpav.com/node/7835 रात्री जेवणात सामीश असल्यास तळलेली अंडी , खीमा , तंदूरी चिकन , हे पदार्थ असावेत. सोबत तोंडी लावायला बोटीकबाब खीमा कबाब असे कबाब असावेत. भात वर्गीय पदार्थात बिर्याणी/ पुलाव असे रुचकर पदार्थ असावेत. सोबत मिर्चीचे सालन असावे. निरामीश असल्यास लग्नात हमखास करतात ती बटाट्याची लगदा भाजी. पावट्याची उसळ. भरल्या वांग्याची भाजी , बिरड्यावालाची रस्शाची उसळ.

दहशत (लोकल गोष्टी-८)

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 27/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत ====================================== मुंबईत राहणाऱ्या.. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाजवळ अशा प्रकारचे भरपूर अनुभव असतील.. मी लिहिलेल्या प्रसंगांपेक्षा जास्त मजेशीर.. खिळवून ठेवणारे.. विचार करायला लावणारे.. हेलावून सोडणारे.. किंवा सुन्न करून टाकणाऱ्या या अशाच अनुभवांनी मुंबईकरांना, एका सूत्रात गुंफले आहे. लोकल प्रवास मुंबई करांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. आणि तितकाच जिव्हाळ्याचाही. मुंबईतली गर्दी, धावपळ, गतिमानता.. लोकल्सच्या वेळा, ऑफिस, घर ऑफिसातल कामकाज.. त्यातूनच शोधून उपभोगलेले.. धरून ठेवलेले उत्सवी क्षण या सगळ्याची नशा मुंबईकरांच्या नसानसांतून वाहताना दिसते.

मिसळपावला मराठी करू चला...

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 27/07/2010 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नव्या बांधणीत मिसळपाववर अनेक जागी इंग्रजी शब्द किंवा वाक्ये दिसत आहेत. ते ताबडतोब मराठी करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे त्या त्या इंग्रजी शब्द किंवा वाक्यांसाठी प्रतिशब्द किंवा वाक्य सूचवावे. असे करते वेळी मूळ शब्द किंवा वाक्य येथे देऊन त्यासमोर मराठी शब्द किंवा वाक्य द्यावे. यामुळे एखाद्या शब्दास प्रतिशब्द कुठला असावा या विषयावर चर्चा होऊ शकते मात्र मूळ काम सोडून अवांतर चर्चा टाळाव्यात. मुक्तस्त्रोत विश्वात अश्या प्रकारे अनेक भाषांतर प्रकल्प चालत असतात. याप्रयत्नामुळे आपल्याला त्याची ओळख होईल. याशिवाय काही कल्पना असतील तर स्वागतच आहे.

बाय

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख - आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे. अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा.

ही नाती कोणती?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 27/07/2010 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ काकी, लवकर जेवायला वाढा, पुन्हा पळायचय." - माझं नेहमीच ओरडणं. "अरे ह्या पोळ्या लाटण्यार्‍या बाया लवकर येतच नाहीत. मी तरी काय करु" काकीच ठरलेलं उत्तर. "मला तुम्ही केलेल्या पोळ्याच आवडतात, अगदी मऊसुत असतात, ह्या बाया नुसत्या कळकट, जळालेल्या कडक पोळ्या करतात" - मी "थांब, मीच तुला गरमागरम पोळ्या करुन देते बघ फटकन." काकी "अहो कॉलेज फक्त अर्धा तासच सुटी देत जेवण्यासाठी, त्यात अर्धा किमी पळत यायचं, कसबसं गिळायचं आणी पुन्हा कॉलेजात जायचं, कसं करणार सांगा बरं?" - मी. अगदी आईवर हक्क गाजवावा तसा आम्ही या आमच्या मेसवाल्या काकीवर गाजवायचो. तरी ही काकी आमच्यावर कधी रागावली नाही की चिडली नाही.