मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावला मराठी करू चला...

सरपंच · · काथ्याकूट
नमस्कार, नव्या बांधणीत मिसळपाववर अनेक जागी इंग्रजी शब्द किंवा वाक्ये दिसत आहेत. ते ताबडतोब मराठी करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे त्या त्या इंग्रजी शब्द किंवा वाक्यांसाठी प्रतिशब्द किंवा वाक्य सूचवावे. असे करते वेळी मूळ शब्द किंवा वाक्य येथे देऊन त्यासमोर मराठी शब्द किंवा वाक्य द्यावे. यामुळे एखाद्या शब्दास प्रतिशब्द कुठला असावा या विषयावर चर्चा होऊ शकते मात्र मूळ काम सोडून अवांतर चर्चा टाळाव्यात. मुक्तस्त्रोत विश्वात अश्या प्रकारे अनेक भाषांतर प्रकल्प चालत असतात. याप्रयत्नामुळे आपल्याला त्याची ओळख होईल. याशिवाय काही कल्पना असतील तर स्वागतच आहे. चला तर मग मिसळपावच्या मराठीकरणात सहभागी होऊया. - सरपंच

वाचने 4437 वाचनखूण प्रतिक्रिया 24

जृंभणश्वान Tue, 07/27/2010 - 09:04
स्वगृह » माझे खाते >>संपादन या विभागात चुकुन Account टॅब राहिला आहे, तिथे खाते हवे. मंगळ, 27/07/2010 - 08:48 सध्या 17 सदस्य आणि 44 पाहुणे आलेले आहेत. सगळे आकडे देवनागरी लिपीतले करत येतील का?

चिरोटा Tue, 07/27/2010 - 10:42
सर्च साटी एक शब्द लिहिला आणि सर्च बटन दाबले.खालील मेसेज दिसला. तुमच्या शोधातून काहीच निष्पन्न झाले नाही.
Check if your spelling is correct. Remove quotes around phrases to match each word individually: "blue smurf" will match less than blue smurf. Consider loosening your query with OR: blue smurf will match less than blue OR smurf.
काहीच निष्पन्न झाले नाही पेक्षा काही सापडले नाही योग्य वाटते.वरील इंग्रजी मेसेज पण मराठीत द्यावा.

वाहीदा Tue, 07/27/2010 - 11:48
जो पर्यंत मिसळपाव चा लोगो 'मिसळ अन पाव' च दिसत नाही तोवर हे मराठमोळे मिसळपाव वाटत नाही. कुठे तरी ते लोगो दिसायला हवे . कृपया मिसळ पावचा फोटो टाकावा ~ वाहीदा

वाहीदा Tue, 07/27/2010 - 12:07
या आधी प्रत्येक लेखा खाली वाचनखुण साठवण्यासाठी एक लिंक असायची आता ती तशी दिसत नाही फक्त मुद्रणसुलभ आवृत्ती चा पर्याय दिसतो आहे. प्रत्येक लेखाखाली आधी सारखा वाचनखुण साठवण्यासाठीचा पर्याय हि द्यावा. ~ वाहीदा

स्वतन्त्र Tue, 07/27/2010 - 12:27
तसा असंही चालेल पण विषय काढलाच आहे तर ...मिसळ पाववर आकडे मराठीत होतील का ?

शानबा५१२ Tue, 07/27/2010 - 12:40
हे काही बदल सुचवतो. you have a new message. नवीन व्ययक्तीक निरोप आहे. Save प्रकाशित करा. Submitted by लेखक Submitted by शानबा५१२ on मंगळ, 27/07/2010 - 11:03. लेखक शानबा५१२ दी. मंगळ,२७/०७/२०१० - ११:०३ 0 Comments ० प्रतिक्रीया आणि प्लीझ कमीत कमी पहील्याचे रंग तरी परत आणा!!

बहुगुणी Tue, 07/27/2010 - 17:18
"Submitted by 'अबक' on वार, ......" याच्या ऐवजी: अबक यांनी ---वारी----वाजता खालील प्रतिसाद दिला: असे करता येईल. आकडे साहजिकच मराठीत असावेत.

बहुगुणी Tue, 07/27/2010 - 17:29
"© 2010 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy" याचं रूपांतर असं करता येऊ शकेल - "कॉपीराईट २०१० मिसळपाव डॉट कॉम. सर्व हक्क अबाधित. *मर्यादित आधिकार आणि जबाबदारी. माहितीची गुप्तता" *"Disclaimer = Any statement intended to specify or delimit the scope of rights and obligations" अशा अर्थाने

क्रेमर Tue, 07/27/2010 - 18:09
कौल या सदराचे वर्णन सध्या इंग्रजीत आहे. ते मराठीत करता येईल. A poll is a question with a set of possible responses. A poll, once created, automatically provides a simple running count of the number of votes received for each response. देवासमोर कौल लाऊन निर्णय घेण्याची परंपरा महाराष्ट्रात असल्याचे मराठी चित्रपट पाहतांना लक्षात येते. आजकालच्या समाजात मात्र लोकांचा कल पाहण्यासाठी जनताजनार्दनासमोर कौल लावला जातो. संकेतस्थळ हे तात्कालीन समाजाचे प्रतिबिंबच असल्याने सदस्य येथे कौल लाऊ शकतात. कौलात शक्य उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. कौल लावल्यानंतर प्रत्येक पर्यायाला पडलेली मते आपोआपच मोजली जातात व पाहता येतात.

In reply to by क्रेमर

Nile Tue, 07/27/2010 - 23:14
कौलात डिस्क्लेमर म्हणुन, "वायफळ कौल सुरु केल्यास देवाचा कोप होउ शकतो" असे टाकता येईल काय हो मास्तर? ;)

In reply to by मेघवेडा

Nile Wed, 07/28/2010 - 01:12
जाउद्या हो, उगाच कशाला तुमचं टाळकं फोडुन फोडताय? बाकी तो डान्या आला नाहीतर उगाच्या उगाच आम्हाला प्रतिसाद टंकावा लागायचा. तुम्हाला मात्र नीट समजुन घ्यायचं असेल तर श्रामोगुर्जींना खरडा. ;-)

वाहीदा Wed, 07/28/2010 - 18:02
मिपाच्या नविन साईटवर मला आलेले पण मी न वाचलेले ३व्यनी संदेश दिसत नाही :-( बाई ग , वाचायचे पण राहीले अन प्रतिसाद ही दिला नाही :-( ... कृपया तो माझ्या संदेश (जुने पोस्टहापीसात) वहीत टाकाल का ? आता मी काय करु ??