कात्रज ते सिंहगड.
जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली.
मिसळपाव
