अहंकार
लेखनविषय:
मिळवली जरी सर्व सुखे ,
न मिळवावा अहंकार
अहंकारातुन जन्मास येतात ,
क्षुद्र आचार विचार.
कळे न तुम्हा कधी,
बदलली तुमची नीती .
कधी विसरला तुम्ही ,
माणुसकी अन नाती.
मग ते जीवन तुमचे ,
जीवन असणार नाही.
ज्यात असेल फक्त स्वार्थ,
समाधान असणार नाही .
जीवन म्हणजे असावा जणु ,
खळखळणारा झरा .
कधीच रिता होणे नाही ,
कितीही पाणी भरा.
वाचने
1202
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
जीवन म्हणजे असावा जणु , खळखळणारा झरा . कधीच रिता होणे नाही , कितीही पाणी भरा.मस्तच. ही सुद्धा आवडली. :)
जीवन म्हणजे असावा जणु